मल्टिपल स्क्लेरोसिस: लक्षणे, कारणे, जोखमीचे घटक, निदान, उपचार
मल्टिपल स्क्लेरोसिस (Multiple sclerosis) हा एक मेंदूचा आजार आहे. हा प्रामुख्याने केंद्रीय मज्जासंस्था वर परिणाम करतो . या आजारामुळे मेंदूवरील नसांचे नुकसान होऊन विपरीत परिणाम घडू शकतात. परिणामी मज्जासंस्था(nervous system) शरीराला संदेश पाठविण्याचे कार्य करू शकत नाही. पेशंटला योग्य त्यावेळी योग्य तो उपचार मिळाला नाही तर पेशंटच्या जीवावर बेतू शकते.मल्टिपल स्क्लेरोसिस हा स्वयंप्रतिरोधक (Autoimmune) आजार मानला जातो. ज्यामध्ये शरीराची स्वयंप्रतिकार प्रणाली शरीरातील पेशींवर हल्ला करतात यामुळे मेंदू आणि पाठीच्या कण्यातील पेंशींभोवती असलेल्या मायलीन या चरबीयुक्त संरक्षक आवरणाला नष्ट करते.म्हणूनच मल्टिपल स्क्लेरॉसिस म्हणजे काय? त्याची कारणे व उपाय कोणते ते पाहुया . मल्टिपल स्क्लेरोसिस लक्षणे: खूप थकवा येतो शक्तीपात झाल्यासारखे वाटते. दृष्टीदोष, दुहेरी दृष्टी (Double vision) हातापायाला मुंग्या येणे किंवा बधीर होणे मान पुढे वाकवताना विजेचा झटका बसल्याप्रमाणे वेदना होणे. उंचीची भीती वाटणे चक्कर येणे स्नायू अशक्त (Muscle weaknes)होणे आणि गोळे येणे अर्धांगवायूचा (Paralytic)झटका येणे तोल आणि समन्वयाशी निगडीत समस्या अस्पष्ट उच्चार, अन्न गिळताना त्रास होणे चालताना त्रास होणे, मलमूत्रविसर्जनाच्या समस्या स्वभावातील चढउतार किंवा नैराश् मल्टिपल स्क्लेरोसिसची कारणे : जी व्यक्ती जन्मतः नाजूक असते किंवा ज्यांच्या शरीरात जीवनसत्वांचे प्रमाण कमी असते अशा व्यक्तींना या आजाराची लागण लवकर होते. कधीकधी हा आजार अनुवंशिक सुद्धा असू शकतो. काही विषाणू आणि पर्यावरणीय घटकही हा आजार होण्यास कारणीभूत ठरतात. विविध प्रकारचे विषाणू एमएसशी निगडित असतात. एपस्टीन बार हा विषाणू मोनो न्यूक्लिओसीस हा आजार होण्यास कारणीभूत ठरतो. जोखमीचे घटक: जीवनसत्त्व ड ची कमतरता असणे अनुवंशिकता मुख्यतः २० ते ४० या वयोगटातील लोक पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये प्रमाण जास्त असते. थायरॉईड, ऍनिमिया, सोरायसिस, मधुमेह किंवा आतड्यासंबंधी आजार असणार्या व्यक्ती धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती मल्टिपल स्क्लेरोसिसचे निदान:: मल्टिपल स्क्लेरोसिसचे निदान करण्याकरिता खालील चाचण्या केल्या जातात रक्ताची चाचणी सेरेब्रोस्पायनल फ्लुएड (Cerebrospinal fluid) चाचणी एमआरआय स्कॅन (MRI Scan) मल्टिपल स्क्लेरोसिस उपचार: १.योग्य औषधे व फिजिकल थेरेपी-फिजिकल थेरपीमुळे(Physical Therapy) स्नायू बळकट होतात व दैनंदिन कामे करणे सोपे जाते. २.एमआरआय स्कॅन -औषधांबरोबर एमआरआय स्कॅन आणि मेंदूविकार तज्ञांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो. ३.बोन मॅरो ट्रान्सप्लांट -ज्या पेशंट मध्ये या आजाराचे गंभीर प्रमाण असते त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा फायदा घेता येतो. ४. एमएस च्या उपचारांमध्ये सातत्याने प्रगती होत आहे, आणि भविष्यात हा रोग संपूर्ण बरा होऊ शकेल अशी औषधें येतील अशी अशा आहे . एमएस च्या उपचारामध्ये लवकर निदान आणि लवकर उपचार फायदेशीर ठरतो. पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispeciality Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.
मल्टिपल स्क्लेरोसिस: लक्षणे, कारणे, जोखमीचे घटक, निदान, उपचार Read More »