हि लक्षणे देतात तोंडाचा कर्करोगचे संकेत!(Symptoms of Oral Cancer in Marathi)

आपले आयुष्य निरोगी असावे हे प्रत्येकालाच वाटत असते. सगळयांना आपल्या अरोग्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवावे लागते. थोड्याशा वेदनेने माणूस अस्वस्थ होतो. पण योग्य काळजी घेतल्यास आणि आपल्याला योग्य ती माहिती असल्यास आपण मोठ्या आजारांना टाळू शकतो. आपले शरीर आपल्याला नेहेमीच सूचना देत असते. कर्करोगासारख्या मोठ्या आजारांची सुद्धा पूर्वसूचना शरीर देत असते. ते वेळीच ओळखू आले तर पुढचे संकट नक्कीच टाळता येऊ शकते. तोंडाचा कर्करोग (Oral Cancer) हा देखील वेळीच ओळखता आला तर योग्य उपचाराने आटोक्यात आणता येतो. कशी सावधगिरी बाळगायची? तोंडाचा कर्करोग याची काय लक्षणे आहेत ?(Symptoms of Oral Cancer) खालील काही लक्षणे दीर्घकाळ दिसत असल्यास उपचारासाठी डॉक्टरांचा  सल्ला घ्यावा. सुरुवातीला तोंडात फोड येतात. लाल किंवा पांढरे फोड गालाच्या आतील बाजूस जास्त दिवस राहिले अथवा वरचेवर येत असतील तर लक्ष ठेवावे. तोंड येणे हा प्रकार सतत होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. घरगुती उपाय करावे पण तज्ञांची मदत नक्की घ्यावी. आवाजात बदल होतो. हा बदल पूर्ववत होत नसल्यास योग्य त्या तपासण्या कराव्यात. बोलण्यास , गिळण्यास त्रास होऊ लागला व तो  प्राथमिक उपचारांनी कमी होत नसेल तर योग्य डॉक्टरांची मदत घ्यावी. तोंडातील जखमा, दुर्गंधी, रक्तस्त्राव, जळजळ, जिभेचा बधिरपणा या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. दात किंवा हिरड्यामधून रक्त येणे, हिराडयांना जखमा होणे, संसर्ग होणे ह्या गोष्टीकडे पण काळजीपूर्वक लक्ष द्यावे. तोंडाचा कर्करोग(Oral Cancer)  कोणालाही होऊ शकतो. परंतु तंबाखू किंवा तत्सम पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला याचा धोका जास्त असतो. कमकुवत प्रतिकारशक्ती हे सुद्धा त्याचे एक कारण असते. तोंडाचा आतील भाग, गाल, जीभ, हिरड्या, ओठ असा कोणत्याही भागाला हा संसर्ग होऊ शकतो. पहिल्या टप्प्यात निदान झाले तर योग्य उपचारांनी हा मौखिक कर्करोग बरा होऊ शकतो. त्यामुळे काळजी करू नये. योग्य ती काळजी घ्यावी. रोजच्या आहार, व्यायाम या गोष्टींबरोबर शरीरात काही बदल होत आहेत का हे तपासात रहावे. त्रासदायक नसलेला बदल सुद्धा मोठ्या आजारचे संकेत देणारा असू शकतो. त्यामुळे दुर्लक्ष न करता विशेष तज्ञांच्या सल्ल्याने शंकानिरसन करून घ्यावे आणि स्वतः ला  आजारांपासून दूर ठेवावे. पुण्यामध्ये इनामदार हॉस्पिटल मध्ये तोंडाचा कर्करोग(Oral Cancer) यावर योग्य पद्धतीने उपचार केले जातात. एकदा अवश्य भेट द्या आणि चिंतामुक्त व्हा. पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल(INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

हि लक्षणे देतात तोंडाचा कर्करोगचे संकेत!(Symptoms of Oral Cancer in Marathi) Read More »