आय व्ही एफ नंतरची काळजी ( Post IVF care in Marathi )
आय व्ही एफ नंतरची काळजी(Post IVF care) काय घ्यावी हे जाणून घेण्याच्या आधी आय व्ही एफ(IVF) काय आहे हे जाणून घेऊया. आय व्ही एफ म्हणजे इन-विट्रो फर्टिलायजेशन (IN VITRA FERTILIZATION ). ज्या जोडप्यांना नैसर्गिकपणे आईवडील होण्यास अडथळे येतात त्यांच्यासाठी आय व्ही एफ (IVF) हे एक वरदान मानले जाते. वंध्यत्वाच्या समस्येवर(On the problem of infertility) मात करण्यासाठी आय व्ही एफ (IVF) प्रभावी व नाजूक प्रक्रिया आहे. ज्या महिलांना या प्रक्रियेद्वारे जावे लागते त्यांना बर्याच मानसिक आणि शारीरिक बदलामंधून जावे लागते. तसेच गुतागुंतीची प्रक्रिया असल्याने या प्रक्रियेआधी आणि नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. आयव्हीएफ ट्रिटमेंट(IVF Treatment) सुरु होण्याच्या आधीपासून आनंदी आणि तणावमुक्त आयुष्य जगण्यास सुरुवात केल्यास आयव्हीएफ ट्रिटमेंट यशस्वी होण्याची शक्यता खूप वाढते. आज आपण या लेखात समजून घेऊया की आय व्ही एफ (IVF) नंतर काय काळजी कशी घ्यावी. आय.व्ही.एफ. या पद्धतीमध्ये, स्त्रीच्या शरीरात तयार होणारी बीजांडे आणि पुरुषाच्या वृषणामध्ये(In the testicles of men) तयार होणारे शुक्राणू यांचे मीलन शरीराबाहेर केले जाते. आय व्ही एफ (IVF)उपचार पद्धतीमध्ये स्त्रीच्या शरीरातील बीजांडनिर्मितीच्या प्रक्रियेचा अभ्यास करून, जास्त बीजांडे तयार होण्याची इंजेक्शन देऊन ही बीजांडे बाहेर काढली जातात. त्यानंतर पुरुषाच्या वृषणामध्ये तयार होणारे शुक्रजंतूदेखील एका जारमध्ये जमा करून, बीजांड आणि शुक्रजंतू यांचा संयोग घडवून आणला जातो. आय व्ही एफ नंतरची काळजी ( Post IVF care) : १. ताण-तणाव टाळा (Avoid Stress) – ही प्रक्रिया गुंता गुंतीची असल्याने जोडप्याला अनेक गोष्टीना सामोरे जावे लागते. जीवन शैलीत बदल करावे लागतात.तुम्ही अशा वेळी जाणिवपूर्वक काही गोष्टी टाळू शकता ज्यामुळे तुम्हाला अधिक ताण येणार नाही. आय.व्ही.एफ उपचारांच्या चांगल्या परिणामांसाठी दोघांनीही जास्त ताण घेणे टाळा.कारण अती ताणाचा स्त्री व पुरुष दोघांच्यांही फर्टिलिटीवर विपरित परिणाम होऊ शकतो. २. व्यसन करणे टाळा (Avoid Addiction) – दारू आणि धुम्र्पान करणे हे गर्भधारणे पुर्वी किंवा गर्भधारणे नंतर करणे चांगले नाही. डॉक्टर तसा सल्ला देतात. पण अनेक जोडपी त्याविषयी जास्त काळजी करत नाहीत. पण त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. धुम्रपान किंवा मद्यपान केल्यास गर्भधारणा राहण्याचे प्रमाण ४५ टक्क्यांनी कमी होऊ शकते ३ – मुबलक पाणी आणि सकस आहार ( Plenty of Water and a Healthy Diet) संतुलित आहार घेणे (Eating a balanced diet) आणि मुबलक पाणी पिणे ( Drink plenty of water) जास्त महत्वाचे आहे. या उपचारात स्त्रियांना काही इंजेक्शन्स दिली जातात.मुबलक पाणी प्यायल्याने ही इंजेक्शन घेताना होणा-या वेदना व सुज कमी होते. स्त्रियांनी दिवसभरात कमीतकमी तीन ते पाच लीटर पाणी प्यावे. तसेच सकस आहार घेणे तितकेच चांगले. गर्भधारणेसाठी खूप उपयोग होतो. ४. डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळापत्रक करा (Schedule an Appointment with the Doctor ) – डॉक्टरांनी दिलेला सल्ला योग्य पद्धतीने आणि काटेकोरपणे पाळा.कोणत्याही वेळी तुम्हाला त्रास अथवा अस्वस्थता जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांना याबाबत सांगा. आय व्ही एफ नंतरची काळजी बद्दल अधिक माहिती साठी संपर्क करा इनामदार हॉस्पिटलमध्ये तज्ञांशी संपर्क करून योग्य सल्ला घ्या आणि चिंतामुक्त व्हा. पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल(INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.
आय व्ही एफ नंतरची काळजी ( Post IVF care in Marathi ) Read More »