कावीळ(jaundice)- पावसाळ्यात घ्यावयाची काळजी
पावसाळा आला की अनेक आजार जन्म घेतात. त्यामुळे पावसाळ्यात विशेष काळजी घेणे अत्यंत काळजी घ्यावी लागते.त्यापैकी हेपटाइटिस कावीळ हा एक मुख्य आजार असतो. आज पाहूयात पावसाळ्यात काळजी कशी घ्यावी. कावीळीचा संसर्ग (Jaundice infection) कसा होतो- कावीळ हा विषाणूजन्य (Viral) आजार आहे. या आजाराचा प्रसार दूषित पाणी, दूषित अन्न, वैयक्तिक अस्वच्छता(Personal Uncleanliness) अशा विविध कारणांमुळे होतो. डोळे, लघवी, नखे पिवळी दिसतात. कावीळ ही दूषित सुया ,कावीळ झालेल्या माणसाचे रक्त वापरल्यास होऊ शकते. कावीळीची लागण झाली की यकृतामध्ये बिघाड(Liver failure) होतो. शरीरात पित्तनलिकेत काही अडथळा असला तर कावीळ होते. कावीळ वाढली तर यकृत निकामी होऊ शकतात म्हणून याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात कावीळ सारखा आजार डोकं काढतो. हा आजार जंक फूड, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाल्यानेही होतो. कावीळीमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. यामध्ये यकृत कमकुवत होऊन काम करणं बंद करतं. शरीरात बिलीरुबिनची पातळी(Bilirubin levels) वाढते. यामध्ये त्वचा, नखं आणि डोळे पिवळे होऊ लागतात. कावीळ झाल्यास बहुतेक लोक औषधं घेतात. पण, औषधांचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आजार झाल्यास घरगुती उपायही करता येतात. पावसाळा आला, पाणी गढूळ झाले की कावीळीचे रुग्ण वाढू लागतात. एखादा सांडपाण्याचा पाइप व पिण्याचा पाण्याचा पाइप एकत्र येत असतील व तिथे काही चिरा पडून पाणी झिरपत असेल तर त्या भागात साथ आढळून येते, पावसाळ्यात कावीळीपासून बचावासाठी खालील गोष्टी कराव्यात. पावसाळ्यात पाणी उकळून घ्यावे व ते स्वच्छ भांड्यामध्ये ओतून घ्यावे. पावसाळ्यामध्ये भाज्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात . विशेषतः पालेभाज्या खाणे टाळावे. फळे सुद्धा स्वच्छ धुऊन व पुसून घ्यावे. त्यांना नीट टोपलीमध्ये झाकून ठेवावे की ज्यामुळे त्यावर माशा व इतर कीटक बसणार नाहीत. पावसाळ्यात बाहेरील अन्न शक्यतोवर खाणे टाळावे. उघडे अन्न तर बिलकुलच खाऊ नये. तेलकट अन्न खाणे टाळावे. पावसाळ्यात पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर जरूर करावा. घराच्या जमिनी फिनाइल नी स्वच्छ पुसून घ्याव्यात की जेणेकरून माशा बसणार नाहीत. पावसाळ्यात आहारात मसाल्यांचा वापर जरूर करावा. रोजचा आहार ताजा आणि शुद्ध असावा. थकवा येऊ नये यासाठी आराम करावा. काळजी घेऊन सुद्धा जर कावीळ रोग झाला, तर डॉक्टरांकडे जाऊन तपासून घेणे गरजेचे आहे. व योग्य ती उपाय योजना करणे व औषध घेणे गरजेचे आहे. कारण ही सुद्धा वेगवेगळ्या प्रकारात मोडते व त्यासाठी योग्य तो औषधोपचार करून घेणे आवश्यक आहे. पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispeciality Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.
कावीळ(jaundice)- पावसाळ्यात घ्यावयाची काळजी Read More »