मुलांमध्ये गिळण्याची समस्या येण्याची सामान्य कारणे कोणती आहेत(Swallowing Problems in Children in Marathi)?

नवजात शिशुंमध्ये किंवा बालपणाच्या कोणत्याही टप्प्यावर उद्भवणारी महत्त्वाची समस्या म्हणजे गिळण्याचा विकार. यालाच डिसफॅगिया असं म्हटलं जात. एखाद्या बालकाला द्रव पदार्थ किंवा अन्नपदार्थ घेताना त्रास होतो तेव्हाही समस्या असू शकते. अशा मुलांना केवळ द्रव पदार्थच नव्हे तर तोंडातील लाळ ही घेण शक्य होत नाही शिवाय गिळतांना त्यांना वेदनाही  होतात. त्यामुळे त्यांना पोषक द्रव्य मिळण्यापासून ते वंचित राहतात स्वाभाविकच या सगळ्याचा मुलांच्या शारीरिक वाढीवर आणि वजन वाढीवर प्रतिकूल परिणाम झालेला दिसतो. डिसफॅगिया म्हणजे आहार घेणे किंवा गिळण्यात अडचण. हे एक लक्षण आहे, रोग नाही. ओरल डिसफॅगिया म्हणजे अन्न किंवा द्रव नियंत्रित करण्यासाठी तोंड, ओठ आणि जीभ वापरण्याच्या समस्या. घशातील डिसफॅगिया म्हणजे गिळताना घशातील समस्या. डिसफॅगिया एखाद्या व्यक्तीला कोणत्याही वयात, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रभावित करू शकतो. डिसफॅगियाची(मुलांमध्ये गिळण्याची समस्या) कारणे डिसफॅगियामध्ये तोंड, घसा किंवा अन्ननलिकेतील रचनेच्या समस्यांचा समावेश होतो. यामध्ये आहार आणि गिळण्यासाठी वापरल्या जाणार्‍या स्नायू किंवा मज्जातंतूंना नुकसान करणाऱ्या परिस्थितींमुळे देखील उद्भवू शकते. खालील काही कारणामुळे मुलांमध्ये गिळण्याची समस्या होऊ शकते. सेरेब्रल पाल्सी(Cerebral Palsy) मेंदूला काही इजा असल्यास  जन्मजात दोष फाटलेले टाळू न्यूरोमस्क्युलर रोग हृदय किंवा फुफ्फुसाची स्थिती डोके किंवा मान कर्करोग प्रीमॅच्युर जन्म  ब्रेन स्ट्रोक डिसफॅगिया(Dysphagia) या विकाराचं कारण म्हणजे मानवाला गिळण्याच्या प्रक्रियेसाठी ज्या स्नायूंची आणि नर्व्हची गरज असते अशा सुमारे 50 स्नायूंच्या जोड्या आणि 6 क्रॅलियल नर्व्ह हे एकत्र काम करतात या दोन्ही गोष्टी एकत्र जोडीने काम करण्याच्या प्रक्रियेत काही गफलत किंवा चूक झाली तर डिस फॅगिया हा विकार उद्भवू शकतो आणि तो वयाच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकतो गिळण्याच्या प्रक्रियेचे प्रमुख चार टप्पे असतात त्यापैकी एक किंवा अधिक टप्पा योग्यरित्या कार्यरत होऊ शकत नसतो तेव्हा हा विकार होतो. या विकाराची लक्षणे किंवा कारण ही व्यक्ती परत्वे वेगवेगळी आढळतात तरीही खाताना किंवा गिळताना त्रास होणे वेदना होण हे याचं महत्त्वाचं लक्षण आहे. मुलांमधील हा विकार ओळखण्यासाठी त्याला आहार घेताना काही त्रास होतो आहे का याकडे तसेच त्याच्या तोंडाच्या घशाच्या स्नायूंच्या हालचालीकडे लक्ष ठेवावे लागते त्याचबरोबर विशेष प्रकारच्या क्ष-किरण तपासणीची किंवा एंडॉस्कॉपी तपासणीची आवश्यकता असते.  सामान्यपणे सर्वच वयोगटात गिळतांना त्रास होण्याची समस्या आढळण्यामागे सर्दी, घसा खवखवणे, घसा बसणे, टाॅन्सील्स, घशाला सुज असणे, किंवा जंतू संसर्ग ही देखील कारणे असतात. परंतू या लक्षणांवर ऊपाययोजना होऊन सुद्धा समस्या कायम असेल तर, तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेली “बेरियम स्वॅलो” ही तपासणी केली जाते. या चाचणीतुन डिस्फॅगियाच निदान करण शक्य होत. काहीवेळा अन्ननलिकेतील दोष, किंवा कर्करोगासारखे गंभीर आजारही या समस्येच्या मुळाशी कसु शकतात. अस असल तरी वैद्यक शास्त्रातीलप्रगत तंत्रज्ञानामुळे या समस्येच शोधन, निदान आणि ऊपाययोजना करता येऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर तज्ञांचा सल्ला घ्या. Roots To wings Child Development Center At Inamdar Multispecialty Hospital पुण्यातील रूट्स टू विंग्स चाईल्ड डेव्हलोपमेंट सेंटर इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispecialty Hospital, Pune) हे एक लहान मुलांच्या आजारासंबंधित तक्रारींवर अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही लहान मुलांच्या मानसिक आजारावर उपचार करतात आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले रूट्स टू विंग्स चाईल्ड डेव्हलोपमेंट सेंटर इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लहान मुलांच्या सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

मुलांमध्ये गिळण्याची समस्या येण्याची सामान्य कारणे कोणती आहेत(Swallowing Problems in Children in Marathi)? Read More »