आक्रमक मुलाला कसे नियंत्रित करावे(How to Control an Aggressive Child in Marathi)?

पौगंडावस्थेत(In adolescence) येणाऱ्या मुलांमध्ये दंगा, चिडचिड, उर्मटपणा(eloquence) वाढत जाताना दिसतो. खरंतर वाढत्या वयासोबत मुलं अशी वागणं साधारण आहे. हट्ट करणे तो पुरवला गेला नाही तर त्याच रूपांतर राग, चिडचिड, आदळआपट यात होणे हे सर्वसामान्य चित्र आहे. काहीवेळा मुलांचं वाढत वय म्हणून बरेच पालक यासगळ्यांकडे दुर्लक्ष करतात पण जर याच वाढतं प्रमाण वाढत गेलं, मुलं अशीच रागीट,आक्रमकतेकडे झुकत गेली आणि हे काही आठवडे, महिने असंच चालू राहील तर हे वेळीच लक्षात घेऊन बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. जाणून घेऊया मुलं आक्रमक होण्याची कारणे(Reasons Why Children Become Aggressive in Marathi) निराशा/अपयश- हल्ली स्पर्धेच सतत अपडेट होत राहणारं स्पर्धेच युग आणि त्यात येणार अपयश, चढाओढ ही न पचवताना येणं. घरात सतत मोठ्यांचे वाद/भांडणं सुरू असणं. मुलांना अभ्यासासाठी अतिशय बंधनं असणं. चिंता-सतत कसलीतरी भीती,अतीविचार यातून निर्माण झालेली चिंता. मेडिकल प्रॉब्लेम- कदाचित मुलांमधील आक्रमकता(Aggressive Child) हा प्रश्न पुढे जाऊन ADHD, Sensory Processing Disorder(SPD), आत्मकेंद्रीपणा(Autism) इथपर्यंत पोहचू शकते. मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं. मुलांना सतत मोबाईल किंवा इतर गॅझेट्स मध्ये गुंतवून ठेवणं. पालकांचा मुलांशी संवाद खुंटणं. मुलं मोठी होतं जातात तसे त्यांच्यात शारीरिक आणि मानसिक बदल होत जातात. त्यांच्या मानसिकतेनुसार त्यांना त्यावेळी समजून घेऊन त्यांच्याशी नाळ बांधून ठेवली तर मुलं ही एकटी पडतं नाहीत आणि त्यांच्यामधील आक्रमकता हळूहळू शमते. जर मुलांमध्ये काही आठवड्यानंतरही आक्रमकता, राग, आदळआपट करणे हे जाणवली, तर याचे परिणाम मुलाच्या शाळेवर होऊ शकतो. त्याचा परिणाम इतर मुलांवर होऊ शकतो, ते इतर मुलांसाठी घातक ठरू शकतं; आणि घरातही वादविवाद, कलह यात भर पडू शकते. अशावेळी बालरोगतज्ज्ञ यांचा सल्ला घेणं जास्त गरजेचे आहे. मुलांमधील आक्रमकता कशी नियंत्रणात आणावी(How to control aggression in children in Marathi) मुलांसमोर वादविवाद टाळणे- मुलं ही ऐकण्यापेक्षा समोर जे घडतंय ते बघून त्यातून जास्त शिकत जातात आणि त्याच अनुकरण करायला लागतात. घरात सतत वादविवाद, भांडण होत असतील तर याचा परिणाम मुलांवर होतो. घरात मोठ्याने बोलणं कमी करणे- घरातील वातावरण हे मुलांच्या जडणघडणीतला खूप मोठा भाग आहे. आपण इतरांशी कसं वागतो, बोलतो यावरून आपली मुलं देखील तसंच वागायला लागतात. मुलांचा स्क्रिनटाईम कमी करणे- हल्ली बरचसं शिक्षण देखील ऑनलाईन आहे, त्यातून बऱ्याच गोष्टी कळत राहतात पण यावरही काही मर्यादा हव्यात. काही वेबसाईट्स, किंवा व्हिडीओ गेम या मुलांना आकर्षित करत राहतात, त्यावर मुलं नेमकं काय बघतायत यावर लक्ष देणे आणि गरजेचा तेव्हढयाच स्क्रिनटाईमची शिस्त मुलांना लावणं गरजेचे आहे. याव्यतिरिक्त मुलांना मोकळ्या मैदानात खेळण्यासाठी प्रोत्साहित करणं, त्यांच्यासोबत खेळणं, वाचन करायला गोडी लावणं यातून मुलं अजून जास्त खुलतात. मुलांना मित्र बनवायला लावणं- खरंतर एकटेपणा, आक्रमकमता येते ती कुणीच ऐकणार, समजून घेणार नसतं यातून. अशात मुलांना मित्र बनवायला मोकळीक द्या, त्यांचे मित्र बना. त्यांच्या वयाच्या मुलांमध्ये त्यांना मिसळू द्या. मुलांना बोलू द्या- आपलं कुणी ऐकलंच नाही तर आपली चिडचिड होते. मुद्दा चूक की बरोबर हे नंतर येतं आधी मुलांना काय म्हणायचं आहे ते पूर्ण ऐकून घ्या. त्यांना व्यक्त होऊ द्या तर त्यांच्या मनाची स्थिती जाणवते आणि त्यानुसार त्यांना समजून घ्यायला हवं. मुलांशी संवाद जिवंत ठेवायला हवा- हल्ली आईवडील दोघेही नोकरी करणारे असले की मुलं दुसरं काहीतरी माध्यम शोधत राहतात व्यक्त होण्यासाठी. अशात पालक आणि मुलं यामध्ये दरी सुद्धा पडते. ती दरी न पडता वेळ काढून मुलांसोबत कुठल्याही विषयावर संवाद करा, हसा, खेळा काही गोष्टी समजून घ्या, समजावून सांगा. मुलांकडून होणाऱ्या चुका त्याचा दोष त्यांना न देता त्या का झाल्या? यावर त्यांना काय वाटतं, त्या परत होऊ नयेत म्हणून काय उपाय करता येतील यावर मनमोकळ्या गप्पा मारा. मुलांना आपल्याशी काहीतरी शेअर करावं वाटणं यात पालकांच मोठं यश असतं. मुलांना अतिशय कडक शिक्षा करणं बंद करा- प्रत्येक मुलाचा कल वेगळा असतो. इतरांशी तुलना करून मुलांना अभ्यासात ताण निर्माण करणं बंद करा. मुलांना बरेचदा एखादा विषय नसतो आवडत त्याबद्दल समजून घेणं त्याविषयी चर्चा करुन तो सहजसोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी त्यांना मदत करायला हवी. आपल्या इच्छेनुसार मुलांनी त्यांचं करिअर निवडावं ही अपेक्षा ठेवणं पालकांनी बंद करायला हवं. मुलांना त्यांच्या आवडीनुसार त्यांचं क्षेत्र निवडण्याची मुभा द्यायला हवी. मुलं चुकली की लगेच त्यांच्यावर आगपाखड न करता शांत राहणं, ती परिस्थिती समजून घेऊन उपाय करणं गरजेचं आहे. मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्या- मुलांकडून चुकून किंवा रागात कुणाचं नुकसान झालं तर सोबत मिळून त्यावर उपाय शोधा आणि यामुळे नेमकं काय झालं? याचे परिणाम काय होतील हे शांत राहून मुलांना समजून सांगा. मुलांमध्ये वाढता राग आणि आक्रमकतेसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा- कधीकधी मुलं ही इतर मुलांपेक्षा जास्त आक्रमक होतात. त्यांचा राग नियंत्रणात आणणं कठीण होऊन जातं. अशावेळी मुलांच्या बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपाय करणं आणि गरज पडलीच तर मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी. कारण कधीकधी मुलांच्या आक्रमकतेमागे असलेले ADHD किंवा Autism हे विकार लवकर लक्षात येत नाहीत. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. काही घरगुती समस्या, त्रास, भावना यांचाही मोठा यात समावेश असू शकतो. अशावेळी तज्ज्ञांच्या मदतीने मिळून मुलांना या आक्रमकता, पराकोटीचा राग, सततची चिडचिड या त्रासातून हळूहळू बाहेर काढू शकता. Roots To wings Child Development Center At Inamdar Multispecialty Hospital पुण्यातील रूट्स टू विंग्स चाईल्ड डेव्हलोपमेंट सेंटर इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispecialty Hospital, Pune) हे एक लहान मुलांच्या आजारासंबंधित तक्रारींवर अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही लहान मुलांच्या मानसिक आजारावर उपचार करतात आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले रूट्स टू विंग्स चाईल्ड डेव्हलोपमेंट सेंटर इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लहान मुलांच्या सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

आक्रमक मुलाला कसे नियंत्रित करावे(How to Control an Aggressive Child in Marathi)? Read More »