Inamdar Hospital

020-66812333

9372619219

Orthopedic and Joint Replacement Hospital in Pune

धावताना होणाऱ्या गुडघेदुखीसाठी करा हे 5 उपाय

धावणे हा व्यायामाचा एक प्रकार आहे. धावण्याने हाडे आणि स्नायू मजबूत होतात. तसेच आपले हृदय आणि फुफ्फुसे धावल्यामुळे निरोगी राहतात. पण काही लोकांना धावल्यानंतर गुडघ्यात तीव्र वेदना होतात. जर तुम्हाला संधिवात असेल तर गुडघेदुखी हे एक सामान्य लक्षण आहे. पण निरोगी हाडे असून देखील गुडघेदुखी होणे हे सामान्य नाही. धावताना काही चुका झाल्यामुळे गुडघे दुखू शकतात. धावताना गुडघेदुखीपासून मुक्त होण्यासाठी आपण काही उपाय करणे आवश्यक आहे ते आपण या आर्टिकल च्या माध्यमातून पाहूया. धावताना होणाऱ्या गुडघेदुःखीसाठी करा हे 5 उपाय धावतांना आपल्या गुडघ्यांमध्ये कित्येकदा वेदना होतात त्याकरिता कोणते उपाय करावेत याबद्दल आम्ही तुम्हाला खालील प्रमाणे माहिती सांगत आहोत. धावण्यासाठी सपाट पृष्ठभाग निवडा – Choose a flat surface to run on धावताना तुम्ही कोणत्या प्रकारच्या जागेवर धावत आहात याकडे लक्ष देणे फार गरजेचं आहे. ओबड धोबड जमिनीवर धावल्याने पाठदुखी किंवा गुडघेदुखी होऊ शकते. धावण्यासाठी पक्का रस्ता किंवा ट्रॅक निवडा यामुळे पायांना आराम मिळेल आणि गुडघेदुखी होणार नाही. यासोबतच धावण्यासाठी योग्य शूज निवडणे आणि परिधान करणेही महत्त्वाचे आहे. धावताना पाय सतत जमिनीवर पडतात आणि लवचिक शूजचा आधार नसल्यास पायाची बोटे, टाच आणि गुडघे दुखू लागतात. म्हणून धावण्यापूर्वी आरामदायक शूज निवडा.  अचानक धावणे टाळा – Avoid sudden running अचानक धावणे ही एक वाईट सवय आहे. या सवयीमुळे धावताना पाय आणि गुडघे दुखू शकतात. धावण्यापूर्वी नेहमी हलका वॉर्म-अप करा. वॉर्म अप करण्यासाठी तुम्ही वेगवान चालणे किंवा 15 मिनिटे चालू शकता. याशिवाय जर तुम्हाला जास्त वेळ धावण्याची सवय नसेल तर प्रथम कमी वेळेपासून सुरुवात करा आणि नंतर हळूहळू वेळ वाढवा. वेगाने धावल्याने अचानक स्नायूंवर दबाव येतो आणि गुडघ्यांमध्ये वेदना जाणवू शकतात.        आसनाची काळजी घ्या – Take care of your posture धावताना तुमची पाठ सरळ आहे किंवा नाही याकडे नक्कीच लक्ष द्या. यामुळे, फुफ्फुस अधिक ऑक्सिजन घेण्यास सक्षम होते. धावताना बोटे सरळ ठेवा जर तुम्हाला तुमच्या हाडांमध्ये वेदना होत असतील तर तुम्ही त्या दिवशी धावणे वगळू शकता. गुडघ्याला आधार देणाऱ्या स्नायूंचाही वेळोवेळी व्यायाम केला पाहिजे. धावताना टाचांचा आधार घेणे टाळा. पाय मागे वळवा पुढे नाही. टाच जमिनीच्या वर ठेवा किंवा ट्रॅक वर ठेवा.      वजन नियंत्रित करा – Control your weight ज्यांचे वजन जास्त आहे त्यांना धावताना गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच सकस आहारावर लक्ष केंद्रित करा. तुमचे वजन जास्त असल्यास तुम्ही सरळ धावण्याऐवजी हलके वेगवान चाला. यासोबतच धावायचेच असेल तर धावताना शरीर पुढे वाकवून धावा. यामुळे शरीराचा संपूर्ण भार गुडघ्यावर पडणार नाही आणि त्यामुळे धावत असतांना वेदना देखील कमी होतील. आपले गुडघे स्थिर ठेवा आणि त्यांना वर उचलू नका. स्नायूंची ताकद आणि लवचिकता वाढवा – Increase muscle strength and flexibility धावण्यासाठी ताकद आणि लवचिकता आवश्यक आहे. जर तुमच्या स्नायूंमध्ये या दोघांची कमतरता असेल तर तुम्हाला धावताना तुमच्या गुडघ्यांमध्ये दुखू शकते किंवा धावताना दुखापत होऊ शकते. या समस्या टाळण्यासाठी स्नायू मजबूत करा. स्नायू मजबूत करण्यासाठी आपण डंबेल व्यायामाची मदत घेऊ शकता. तसेच कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. त्यामुळे तुमचे स्नायू मजबूत आणि लवचिक होतील त्यामुळे गुडघे दुखणार नाहीत. तुम्हालाही चालताना किंवा धावताना गुडघेदखीची समस्या जाणवत असेल तर Inamdar Hospital, Pune येथील तज्ञ Orthopedic डॉक्टरांशी संपर्क करा.

धावताना होणाऱ्या गुडघेदुखीसाठी करा हे 5 उपाय Read More »

मणक्याच्या चकती वरील शस्त्रक्रिया

आपल्या पाठीच्या मणक्यांची विशिष्ट रचना असते. या मणक्याच्या रचनेत पाठीच्या मणक्यांची हाडे एकमेकांवर साखळीप्रमाणे विशिष्ट पद्धतीने गुंफलेली असतात. या दोन हाडांच्या मध्ये एक चकती असते. तिला शास्त्रीय भाषेत ‘इंटर व्हर्टिब्रल डिस्क – Inter Vertibral Disk’ असे म्हणतात. म्हणजेच ‘मणक्यातील  चकती ‘. पाठीच्या हालचाली, वाकणे, उडी मारणे या क्रियेमध्ये मणक्यांचा दाब  shock absorber प्रमाणे सहन करणे, हे  या चकतीचे काम असते. ही चकती सरकते अथवा फुटून बाहेर येते (हर्नियेटेड डिस्क(Herniated Disk)) तेव्हा मणक्यामध्ये असणाऱ्या मज्जारज्जूच्या नसांवर दाब येतो. त्यामुळे पायामध्ये वेदना होणे, त्या पाठीपासून पायाकडे सरकणे, मांडीमध्ये वेदना होणे, मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे, पायातील ताकद कमी वाटणे, मलमूत्र विसर्जनावरील नियंत्रण कमी होणे, यासारखी लक्षणे आढळून येतात. तज्ज्ञ डॉक्टर रुग्णाचे परीक्षण करून पाठीच्या मणक्याचे एक्स रे (X-Ray), एमआरआय(MRI), गरजेप्रमाणे सिटी स्कॅन (City Scan) करून निदान करतात. या ठिकाणी रुग्णाची लक्षणे, डॉक्टरांना तपासणीमध्ये आढळलेली निरीक्षणे व निदान तपासणीचा अहवालाचा सारासार विचार करूनच शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. मणक्याच्या चकती वरील  खालील प्रकारे शस्त्रक्रिया  केल्या जातात:                       १. ओपन डिस्केक्टॉमी (Open Discectomy): पाठीवर छेद घेऊन खराब चकती काढून ही शस्त्रक्रिया केली जाते. २. मायक्रोडिस्केक्‍टॉमी (Microdiscectomy) : या शस्त्रक्रियेमध्ये सर्जन एका छोट्याशा छेदातून कॅमेरा असलेली ट्यूबनळी घालून परीक्षण करतात व काही विशिष्ट अत्याधुनिक यंत्राच्या मदतीने खराब डिस्क काढली जाते. ३. लंबर लॅमिनेक्टॉमी (Lumbar Laminectomy): काही वेळा मणक्यामधील हाडाचा छोटासा भाग सर्जनला काढावा लागतो. मणक्याच्या या भागाला ‘लॅमिना’ म्हणतात. हा लॅमिना हाडांच्या आवरणातून मज्जारज्जूचे रक्षण करत असतो. खराब चकतीपर्यंत पोचण्यासाठी काही वेळा ही लॅमिनेक्टॉमी करण्याची अवश्‍यक असते. ४. मणके जोडणे (स्पायनल फ्युजन (Spinal fusion)) : लॅमिनेक्टॉमी (Laminectomy) अथवा डिस्केकटॉमी (Discectomy) नंतर सर्जन काही वेळा मणके जोडण्याची शस्त्रक्रिया करतात त्याला ‘स्पायनल फ्युजन’ म्हणतात. मणक्यांची रचना स्थिर राहण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे असते. दोन हाडांना जोडल्याने ते स्थिर राहिल्याने वेदनाही कमी होतात. ५. आर्टिफिशियल डिस्क रिप्लेसमेंट (Artificial Disc Replacement): खराब चकती काढून त्या ठिकाणी कृत्रिम चकतीचे रोपण केले जाते. ही कृत्रिम चकती मणके स्थिर ठेवण्यास तसेच मणक्याच्या हालचाली सुलभ करण्यात मदत करते.या शस्त्रक्रिया आता ‘मिनिमल इन्व्हेसिव्ह’ पद्धतीने करता येतात. त्यामुळे या शस्त्रक्रियेमध्ये कमीत कमी छेद, कमीत कमी रक्तस्राव, जलद आराम हे फायदे असतात. रुग्ण शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हालचाली करू शकतो. फिजीओथेरपीद्वारा (Physiotherapy) अशा प्रकारच्या मणक्याच्या चकती वरील शस्त्रक्रियांवर  सहज मात करता येऊ शकते. इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया केली जाते. पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल  हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispeciality Hospital) सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

मणक्याच्या चकती वरील शस्त्रक्रिया Read More »

जॉइंट रिप्लेसमेंट (Joint Replacement) नंतर कशी घ्यावी काळजी?

जॉइंट रिप्लेसमेंट (Joint Replacement) ,ज्याला आर्थ्रोप्लास्टी (Orthoplasty) देखील म्हणतात. जेव्हा उपचारांनी तीव्र सांधेदुखी कमी होत नाही तेव्हा सांधे बदलणे हाच एक उपाय केला जातो. या शस्त्रक्रियेमध्ये खराब झालेले सांधे बदलून कृत्रिम सांधे बसवले जातात. हे सांधे धातू, सिरॅमिक किंवा प्लास्टिकचे बनलेले असतात. शल्यविशारद (Surgeons) आपल्या शरीरातील कोणत्याही भागाचा सांधा बदलु शकतात. पण सर्वात जास्त हिप, गुडघा आणि खांदा रिप्लेसमेंटच्या केसेस मोठ्या प्रमाणात आढळून येतात. सांधे  (Joint replacement ) नंतर रुग्णाला बरे होण्यासाठी 6 ते 8 आठवडे लागतात. यादरम्यान खूप काळजी घ्यावी लागते. जास्त हालचाल किंवा कोणत्याही प्रकारचे काम करण्याचा प्रयत्न करू नये, कारण यामुळे इतर समस्या उद्भवू शकतात. सांधे प्रत्यारोपणा (Joint Replacement) नंतर आपली काळजी कशी घ्यावी ते आपण जाणून घेऊया – १. वेळेवर डॉक्टरांना भेटणे आणि औषधे घेणे. २. जर शस्त्रक्रियेनंतर औषधे बदलली असतील तर औषधांच्या प्रिस्क्रिप्शनची (Prescription) नोंद ठेवणे. ३.आधारा शिवाय चालण्याचा प्रयत्न करू नये. चालण्यासाठी काठी किंवा वॉकर वापरणं आवश्यक आहे. ४. शस्त्रक्रिया झाली त्याठिकाणी जर सूज किंवा रक्तस्त्राव होत असेल किंवा पाय पिवळे-निळे दिसत असतील तसेच ताप, वेदना, जळजळ असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधणे. ५. शस्त्रक्रिया केली गेली आहे, त्या ठिकाणी साबण आणि पाण्याने हळुवारपणे धुवावे आणि स्वच्छ कापडाने हलक्या हाताने कोरडे करावे. शस्त्रक्रिया केलेल्या भागाभोवती लोशन किंवा पावडर लावू शकतो जेणेकरून टाक्यांवर जखम होणार नाही. ६. टाके असलेल्या भागात दोन आठवडे पाणी लागू देऊ नये. ७. टाके बरे होण्यासाठी 7 ते 10 दिवस लागू शकतात आणि जर 2 आठवड्यांनंतर टाके निघाले नाहीत, तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हळुवारपणे काढतात. ८. शस्त्रक्रियेनंतर स्नायु बळकट व्हावे यासाठी लोहयुक्त आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. द्रवपदार्थ भरपुर प्रमाणात घ्यावे. ९. एकाच जागी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ बसू नका. थोडा वेळ चाला. १०. Joint replacement नंतर स्नायू पूर्ववत बरे झाल्यानंतरही काही महिन्यांपर्यंत खेळणे देखील टाळले पाहिजे तसेच सायकल चालवणे, पोहणे, इतर व्यायाम देखील टाळावे. ११. डॉक्टरांनी दिलेले व्यायाम नियमित करावे. जर हे व्यायाम नियमितपणे केले नाहीत तर सांध्यांच्या हालचालीत अडचण येऊ शकते. Joint Replacement नंतर कोणत्याही प्रकारची अडचण आली तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उगाचच घरगुती उपाय करून वेळ वाया घालवू नये.  नाहीतर खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल आणि रिप्लेसमेंट केलेला भागही निकामी होऊ शकतो. पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispeciality Hospital) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispeciality Hospital)  सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते

जॉइंट रिप्लेसमेंट (Joint Replacement) नंतर कशी घ्यावी काळजी? Read More »