ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूतील रक्तस्त्राव

ब्रेन हॅमरेज ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूतील रक्तस्त्राव यासाठी तातडीची मदत गरजेची असते. जेव्हा काही कारणाने मेंदूमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला भागात अचानक रक्त वाहू लागते तेव्हा असे घडते. ब्रेन हॅमरेज ही एक अशी स्थिती आहे जी धमनी (हृदयापासून शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त वाहून नेणाऱ्या नळ्या) फुटल्यामुळे उद्भवते. या स्थितीत, आसपासच्या ऊतींमध्ये रक्तस्त्राव सुरू होतो. या स्थितीत मेंदूच्या पेशी रक्तस्रावामुळे नष्ट होतात. तसेच, यामुळे मेंदूच्या अनेक भागांचे नुकसान होऊ शकते. ब्रेन हॅमरेज हा स्ट्रोकचा एक प्रकार आहे. हे मेंदूतील धमनी फुटल्यामुळे आणि आसपासच्या ऊतींमध्ये  स्थानिक रक्तस्त्राव होण्यामुळे होते. हा रक्तस्त्राव मेंदूच्या पेशी नष्ट करतो, मेंदूतील रक्तस्रावांना सेरेब्रल हेमोरेज, इंट्रा कॅरेनिअल  हेमोरेज, किंवा इंट्रा सेरेब्रल हेमोरेज असेही म्हणतात. ब्रेन हॅमरेजचे प्रकार आणि कारणे(Types and Causes of Brain Hemorrhage) सबड्यूरल हॅमरेज एक्स्ट्राड्यूरल सुबराकनॉइड इंट्रासेरेब्रल ब्रेन हॅमरेज लक्षण(Symptoms Of Brain Hemorrhage) – ब्रेन हॅमरेज ही एक जीवघेणी स्थिती आहे ज्यामुळे शरीरात काही गंभीर लक्षणे दिसतात. अशा परिस्थितीत खाली दिलेल्या लक्षणांपैकी कोणतीही लक्षणे जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे किंवा जवळच्या रुग्णालयात जा. सुस्त वाटणे चक्कर, तीव्र डोकेदुखी हात आणि पाय मध्ये अचानक अशक्तपणा सुस्त वाटणे फेफरे उलट्या आणि मळमळ पाहण्यात अडचण बोलण्यात अस्वस्थता गिळण्यास त्रास होणे चालविण्यास अक्षम हाताची हालचाल बसता येत नाही असे वाटणे ब्रेन हॅमरेज कारणे(Causes of Brain Hemorrhage) ब्रेन हॅमरेजची अनेक कारणे आहेत मेंदूवर आघात होणे फुगलेली रक्तवाहिनी फुटणे (अन्युरिझम ) जन्मापासून खराबपणे जोडलेल्या धमन्या किंवा शिरा उच्च रक्तदाब ट्यूमर अपघात (डोक्याला जबर मार लागणे) मेंदूतील ट्यूमरमध्ये रक्तस्त्राव होणे रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा दुष्परिणाम काही अतिशय दुर्मिळ कारणे, आजार, इ.आजारांमुळे मेंदूमध्ये रक्ताची उत्स्फूर्त गळती होऊ शकते. डोक्याला झालेल्या आघातांमुळे अनेक गंभीर इन्ट्रासेरेब्रल हेमॅटोमास होऊ शकतात. ब्रेन हॅमरेज किंवा मेंदूतील रक्तस्राव रोखण्याचे मार्ग उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवा आणि वेळोवेळी तपासणी करत रहा दररोज व्यायाम करा धुम्रपान टाळा कोणत्याही दुर्घटनेनंतर सबड्यूरल आणि एक्स्ट्राड्यूरल हॅमरेज होतात. खूप वेळ हॅमरेज झाल्यास मेंदूवर परिणाम होऊ शकतो. सुबराकनॉइड आणि इंट्रासेरेब्रल हॅमरेज अचानक होऊ शकतात. जर रक्तवाहिनीमध्ये थोडीशी इजा झाल्यास तो बेशुद्ध होऊ शकतो. मेंदूला दुखापत होणे टाळा आणि गाडी चालवताना हेल्मेट घालायला विसरू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यावरच औषधे घ्या. याशिवाय या विषयावर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Inamdar Multispeciality Hospital पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispecialty Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूतील रक्तस्त्राव Read More »