अँजिओग्राफी म्हणजे काय ते जाणून घ्या
अँजिओग्राफी(Angiography) बद्दल बोलायचं म्हटलं तर ती एक महत्त्वाची तपासणी आहे. अँजिओग्राफी हा रक्तवाहिन्या, धमन्या आणि शिरा यांचा एक प्रकारचा क्ष-किरण सारखा वैद्यकीय अभ्यास आहे, ज्याचा उपयोग हृदयविकार, किडनी संसर्ग, ट्यूमर आणि रक्त गोठणे इत्यादी तपासण्यासाठी केला जातो. अँजिओग्राफी(Angiography) हा शब्द आपण भरपूर वेळा ऐकलाच असेल. त्याबद्दल अनेक समज गैरसमज असतात. डॉक्टरांनी याचा सल्ला दिल्यावर रुग्ण खूप घाबरतात पण तसे घाबरायचे कारण नसते. म्हणून अँजिओग्राफी म्हणजे काय ते जाणून घ्या. डॉक्टरांना वाटत असल्यास की व्यक्तीला हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे. तर ते त्याची अँजिओग्राफी करण्यास सांगतात. अँजिओग्राफी मध्ये रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत का? ब्लॉकेजेस कुठे व किती आहेत. या सगळ्या गोष्टी अँजिओग्राफी मध्ये समजतात.. तसेच ब्लॉकेजेसची स्थिती समजते. या तपासणीला Coronary angiography म्हणतात. रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी आहे की नाही याचे नक्की निदान सापडते. अँजिओग्राफी(Angiography) तपासणी करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ लागतो ही तपासणी खूप महत्त्वाची आहे. ऍन्जिओग्राफी करण्याच्या अगोदर तीन ते चार तास अगोदर काही खाल्लं नसावं. कारण काही सोप्या टेस्ट असतात. हॉस्पिटलच्या एक्स-रे किंवा रेडिएशन थेरपी विभागात अँजिओग्राफी(Angiography) केली जाते. यास सहसा 30 मिनिटे ते दोन तास लागतात आणि तुम्ही त्याच दिवशी घरी जाऊ शकता. अँजिओग्राफीनंतर कमीतकमी २ तासांनंतर रुग्ण घरी जाऊ शकतो. जर तुम्हाला छातीत दुखत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा अस्वस्थता असेल, तर डॉक्टरांशी चर्चा करणे आणि त्यांच्या सल्ल्या प्रमाणे औषधोपचार करणे योग्य ठरते. अँजिओग्राफीनंतर वजन उचलणे किंवा उंच चढावर चालणे यासारखे जड व्यायाम 4-6 आठवडे टाळावेत. अँजिओग्राफीनंतर विशिष्ट प्रकारचे आहार बंद करणे आवश्यक आहे असा सर्वसाधारण समज आहे. आहारामध्ये समतोल आहार घेणे योग्य ठरते, जास्त मसालेदार ,तेलकट पदार्थ खाणे टाळणे, भरपूर पाणी पिणे , फळ खाणे हलका व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. आजकाल जीवनशैली बदललेली आहे. अगदी तरुण ते प्रौढ माणसांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळे सर्वांनी हार्ट अटॅक पासून लांब राह्ण्यासाठी आणि वेळेत उपचार करून घेण्यासाठी कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो सल्ला घ्यावा. पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल(INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करत
अँजिओग्राफी म्हणजे काय ते जाणून घ्या Read More »