कानातील वेदना: सामान्य कारणे आणि त्यावरील उपचार
आपल्या शरीराच्या अवयवांपैकी एक महत्त्वाचा अवयव किंवा ज्ञानेंद्रिय म्हणजे कान. कानातील वेदना सहसा अस्वस्थता निर्माण करते, यामुळे व्यक्तीचे सामान्य जीवन प्रभावित होऊ शकते आणि कुठल्याही कामाकडे सुद्धा लक्ष लागत नाही. कानातील वेदना, किंवा ओटाल्जिया, ही एक सामान्य समस्या आहे जी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणालाही जाणवू शकते. कानातील वेदना: सामान्य कारणे कानातील संसर्ग : कानातील संसर्ग हा कानाला वेदना होण्याचा सर्वात सामान्य असे कारण आहे. बॅक्टेरिया किंवा व्हायरसच्या संसर्गामुळे कानाचा भाग, मध्यकान किंवा आतल्या कानात सूज येऊ शकते, ज्यामुळे तीव्र वेदना जाणवू शकतात. वायूचा दबाव : उंचावर चढताना किंवा विमान प्रवासादरम्यान वायूच्या दबावातील अचानक बदलामुळे कानात वेदना होऊ शकते. यालाच “बॅरोट्रॉमा” असे म्हणतात. हे सुद्धा कानातील वेदनेचे कारण आहे. बाह्य वस्तू : कानामध्ये मुंगी, धूळ, डास किंवा इतर काही वस्तू अडकली असल्यास तीव्र वेदना जाणवू शकतात. हे कारण विशेषतः लहान मुलांमध्ये आढळते कारण मुले खेळत असताना त्यांच्या कानामध्ये काही जाऊ शकते हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि कालांतराने कानाला वेदना जाणवतात. दातांची समस्या : दातांमध्ये काही दुखणे असल्यास, दातांचा संसर्ग असल्यास किंवा इतर काही दातांच्या समस्या असल्यास कानांमध्ये वेदना जाणवू शकतात. दातांच्या आणि कानांच्या नर्व्हच्या जवळ असल्यामुळे हा संबंध येतो आणि त्यामुळे दंत दुखी असताना कानांमध्ये वेदना जाणवू शकतात. एलर्जी : धुळ किंवा इतर ऍलर्जंस मुळे कानामध्ये सूज येऊ शकते किंवा कानांमध्ये इतर काही समस्या जाणवू शकतात आणि त्यामुळेच कानांमध्ये वेदना निर्माण होतात. इअरवॅक्स बिल्डअप/ कानामध्ये मळ जमा होणे : कानामध्ये मळ जमा झाल्यामुळे अडथळे येऊ शकतात, आणि त्यामुळे कानामध्ये ताप येऊ शकतो तसेच वेदना सुद्धा जाणवू शकतात. कानाचा पडदा फाटणे: आघातामुळे किंवा इतर काही कारणांमुळे कानाचा पडदा फाटू शकतो आणि त्यामुळे कानाला तीव्र वेदना जाणवू शकतात. टेम्पोरोमँडिब्युलर जॉइंट (टीएमजे) विकार: जबड्याच्या सांध्यामधील बिघडलेल्या कार्यामुळे सुद्धा कानामध्ये वेदना जाणवू शकतात. कानात पाणी जाणे : कानामध्ये पाणी गेल्यामुळे सुद्धा कानाला वेदना जाणवू शकतात त्यामुळे कानामध्ये पाणी न जाऊ देण्यासाठी काळजी घ्यावी. घशाचा संसर्ग : काही वेळा घशाला संसर्ग झालेला असल्यास सुद्धा कानाला वेदना जाणवू शकतात. कानातील वेदनेवर उपचार : औषधे : कानातल्या वेदनांसाठी पेनकिलर्स जसे की आयबूप्रोफेन किंवा पॅरासिटामोल घेणे फायदेशीर असू शकते. यामुळे वेदना आणि सूज कमी होऊ शकते, परंतु डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य असेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत. अँटिबायोटिक्स जर कानातील वेदना संसर्गामुळे झाली असेल, तर डॉक्टर अँटिबायोटिक्स prescribe करू शकतात. यामुळे कानामधील संसर्ग नियंत्रणात आणला जाऊ शकतो. गरम किंवा थंड कॉम्प्रेस : गरम कॉम्प्रेस (कोमट/कमी गरम पाण्यात बुडवलेला कपडा) कानावर ठेवल्याने वेदना कमी होऊ शकते. किंवा कधी कधी बर्फाचा शेक देणे सुद्धा उपयोगी ठरते. कान साफ करणे : कानामध्ये काही अडकले असल्यास डॉक्टरांच्या मदतीने ते काढून घेणे आवश्यक आहे, यामध्ये दिरांगाई न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि कानामध्ये काही अडकले असल्यास ते काढून घ्यावे. डॉक्टरांचा सल्ला : जर कानातील वेदना दीर्घकाळ टिकत असेल किंवा ती वाढत असेल, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर योग्य निदान आणि उपचार देण्यास सक्षम असतात आणि कानाच्या वेदना सुद्धा डॉक्टर नियंत्रणात आणू शकतात. इअरवॅक्स काढणे / कानातील मळ काढणे : कानामध्ये वेदना होण्याचे कारण जर कानामध्ये झालेला मळ असेल तर डॉक्टरांकडून कानामधील मळ काढून घ्यावा त्यामुळे कान मोकळा होऊन वेदना सुद्धा कमी होतील. च्युइंग गम खाणे : कानाच्या संसर्गावर च्युइंग गम खाणे फायदेशीर ठरू शकते. सरळ झोपावे : कानामध्ये वेदना जाणवत असल्यास किंवा कान दुखी असल्यास शक्यतो सरळ झोपावे म्हणजेच एका कुशीवर झोपू नये, या उपायाने सुद्धा कानामधील वेदना कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदिक उपचार : बरेच घरगुती आयुर्वेदिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत परंतु योग्य व्यक्तीच्या किंवा अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपाय करावे. ओव्हर-द-काउंटर कानाचे ड्रॉप्स : जर कानाचा पडदा फाटलेला नसेल तर ओव्हर-द-काउंटर कानाचे ड्रॉप्स वेदना कमी करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. कानातील वेदना एक सामान्य समस्या आहे, परंतु याला दुर्लक्ष करणे किंवा स्वतःच उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते. वेदनेचे कारण जाणून घेऊन त्यावर योग्य उपचार करणे आवश्यक आहे. कानाच्या आरोग्याची काळजी घेतल्यास आपण या समस्यांपासून दूर राहू शकतो. कानाची कुठलीही समस्या जाणवत असल्यास तात्काळ स्थानिक डॉक्टरांशी संपर्क करावा किंवा इनामदार हॉस्पिटल येथे संपर्क साधू शकता.
कानातील वेदना: सामान्य कारणे आणि त्यावरील उपचार Read More »