पावसाळ्यातील रोग : सामान्य रोग व त्यांचा प्रतिबंध
उन्हाळ्याने त्रस्त होऊन आपण पावसाची व्याकुळतेने वाट पाहतो. माणसे, पक्षी, प्राणी, झाडे, वेली, अगदी जीव जंतू देखिल सगळे त्या मेघराजांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि जून अखेर ढगांच्या गडगडाटासह तुफानी वाऱ्याची सलामी घेत पाऊस येतो आणि आनंद होतो.पण पावसाबरोबरच अनेक समस्या देखील येतात. रोगराई पसरण्याचा सर्वाल अनुकूल काळ हाच असतो. पावसाळ्यात उद्भवणारे आजार सामान्य ताप सर्दी खोकला डासांमुळे होणारे प्रादुर्भाव विषाणूजन्य मोठे आजार पचनाचे आजार सामान्य ताप आणि सर्दी खोकला हवामानात वाढलेली पाण्याची आर्द्रता यांमुळे, नाक गळणं, शिंका,खोकला, कफ, घशात जळजळ, गिळताना त्रास होणं हे आजार हळूहळू गपचुप त्यांचे बस्तान बसवून कालांतराने डोकं वर काढतात. वेळीच डॉक्टरांनी सुचवलेल्या योग्य त्या औषधांमुळे हे आजार टाळता येतात. डासांमुळे होणारे आजार पावसाळ्यात रस्त्यावरील खड्यांत साठलेल्या दूषित पाण्यामध्ये किंवा घरातील बागेत, कुंड्यांच्या खाली ठेवलेल्या ताटलीत साठलेल्या पाण्यात डास अंडी घालुन त्यांची भरपूर प्रजाती निर्माण करतात. डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया सारखे गंभीर आजार आपल्याला भेट म्हणून घेऊन येतात. यावर वेळीच डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेतल्यास हा आजार आटोक्यात येऊ शकतो. पचनाचे आजार पावसाळ्यात अशुद्ध पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळले गेल्यास ते पाणी पिण्यासाठी अन्न शिजवण्यासाठी वापरले गेल्यास (Dysentery, Diarrhea, Typhoid) लुज मोशन्स, डायरिया, टायफाईड हे आजार उद्भवतात. पोटदुखी, अतिसार, भरपूर ताप येणं, मळमळ उलटी ही लक्षणं या आजारांमध्ये दिसुन येतात. अनेकदा बाहेरचं अन्न खाल्ल्याने हा त्रास होतो.उघड्यावरच्या पदार्थांवर माश्या बसल्याने त्यामध्ये विषाणू जातात.आणि त्यामुळे पचनाचे त्रास होतात. अशा वेळी घरचा चौरस आहार, स्वच्छ पाणी आणि योग्य औषधाने या आजारांपासून आपण दूर राहू शकतो. आपले शरीर आपल्याला सतत बदलांचे इशारे देत असते. त्याची भाषा ओळखून आपण सगळे आता सतर्क राहून बचाव मोहीम तयारीला लागुया. पावसाळी आजार प्रतिबंध पावसाळ्यात आजार अंगावर न काढणे खूप महत्वाचे ठरते. सामान्य आजार दोन तीन दिवसात बरे न झाल्यास नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सामान्यतः पावसात भिजल्यावर घरी येऊन अंघोळ करून कोरडे कपडे घालणे, स्वच्छ पाणी पिणे, चौरस आहार घेणे. मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात खाणे. शांत झोप घेणे, व्यायाम करणे. अशी जीवन शैली असल्यास प्रत्येकजण आजार रोखू शकतो आणि पावसाचा आनंद घेऊ शकतो. Inamdar Multispeciality Hospital पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispecialty Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.
पावसाळ्यातील रोग : सामान्य रोग व त्यांचा प्रतिबंध Read More »