हिवाळ्यातील पुरळांपासून मुक्त कसे व्हावे(How to Get Rid of Winter Acne in Marathi)
संपूर्ण वर्ष जरी का तुमच्या शरीराची त्वचा ही निरोगी राहत असली तरी देखील वातावरणातील जस जसा तापमान कमी होत जातो आणि हिवाळा म्हणजे थंडी येत जाते त्यामुळे तुमच्या त्वचेवरील(Skin) आद्रता कमी होत जाते आणि त्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडत जाते. त्यामुळे सहसा थंडी मध्ये जास्त प्रमाणात त्वचेचे रोग होत असतात. त्यातलाच एक पुरळ नामक रोग आपल्या त्वचेला होत असते. तर आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की, त्या पुरळ ला नाहीसे कसे करावे? तर काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी हिवाळ्यातील पुरळांपासून(acne)मुक्त कसे व्हावे या article च्या माध्यमातून सांगणार आहोत की, तुमच्या त्वचेवरील पुरळ नाहीसे कसे करावे. करीता आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो की, प्रस्तुत article सुरवाती पासून ते शेवटपर्यंत नक्की वाचा. पुरळ म्हणजे काय? – पुरळ मध्ये नेमके काय होते(What is a rash? – What exactly happens in a rash) पुरळ हा त्वचा रोग आहे जो आपल्या शरीराच्या त्वचे वरील आद्रता कमी झाल्यामुळे होत असते. आता पुरळ मध्ये नेमके काय होते ते आपण त्यांची लक्षणे पाहून समजून घेऊया. त्वचेवर लालसरपणा येणे त्वचेवर सूज येणे त्वचेला खाज सुटणे त्वचा सोलणे त्वचा संवेदनशील होणे वरील सांगितलेले लक्षण तुमच्या शरीरावर दिसू लागले तर समजून जायचं की तुम्हाला पुरळ झालेले आहे. हिवाळ्यात पुरळ येण्याची काय कारणे आहेत(What are the causes of winter rash in marathi)? तुम्हाला पुरळ काय आहे आणि पुरळ झाल्यावर नेमके काय होते हे तर समजलेले आहे परंतु नेमका हिवाळ्यामध्ये हे पुरळ का होते हे आपण आता त्यांची काही संभाव्य कारणे वाचून तुम्हाला समजेल की पुरळ हिवाळ्यामध्ये का होते? आपल्या त्वचेवर नैसर्गिक तेल आणि मृत त्वचेच्या पेशी असतात यामुळे आपली त्वचा ही मऊ आणि गुळगुळीत राहते परंतु बाहेरच्या वातावरणातील कमी आद्रता, थंड हवा तसेच वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे नैसर्गिक तेल आणि मृत त्वचेच्या पेशा काढून टाकतात त्यामुळे आपल्या त्वचेवरील ओलावा नष्ट होते. आणि त्यामुळे आपल्याल पुरळ होत असते. याशिवाय आणखी काही संभाव्य कारणे आहेत ज्यामुळे पुरळ होत असते ते खालील प्रमाणे आहेत. आपल्याला वारंवार येणारा थकवा आणि वाढत्या ताणामुळे आपल्याला पुरळ होण्याची शक्यता असते. कित्येकदा आपल्याला असणाऱ्या एखाद्या प्रकारच्या ऐलर्जी मुळे देखील पुरळ होण्याची शक्यता असते. जीवाणूंचा संसर्ग झाल्यामुळे देखील पुरळ होण्याची शक्यता असते. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ जसे की, साबण, दुर्गंधीनाशक साबण, डिटर्जंट किंवा इतर रसायन मुळे देखील आपल्याला पुरळ होण्याची शक्यता असते. जिवाणू किंवा जंतू यांच्या वाढत्या संसर्गामुळे देखील आपल्याला पुरळ होण्याची शक्यता असते. आता तुम्हाला माहिती झाले की, पुरळ म्हणजे नेमके काय होते आणि पुरळ होण्यामागील कारण तर समजलेले आहेतच परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे तर समजलेच परंतु या पुरळांना नाहीसे कसे करायचे? तर काळजी करू नका आम्ही तुम्हाला सर्व माहिती सांगतो. हिवाळ्यातील पुरळांपासून मुक्त कसे व्हावे(How to get rid of winter acne in marathi) हिवाळ्यामध्ये होणाऱ्या पुरळ पासून मुक्त होण्यासाठी खालील प्रमाणे काही उपाय सांगितलेले आहेत ते जर तुम्ही पाळले तर तुमची पुरळांपासून मुक्तता नक्कीच होईल याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. अंघोळी नंतर मॉइश्चरायझ करावे:- रसायनयुक्त नसणारे काही मॉइश्चरायझर असतात त्यांचा वापर करून नियमितपणे अंघोळ झाल्यानंतर त्यांचा वापर करावे ज्यामुळे तुमच्या शरीरावर ओलावा राखून ठेवला जाते. कोमट पाण्याने अंघोळ करावे:- गरम पाण्याने अंघोळ करू नये त्यामुळे शरीरावरील नैसर्गिक तेल काढून घेते त्यामुळे नेहमी कोमट पाण्याने अंघोळ करावी. पूर्ण कपडे परिधान करावे:- हिवाळ्याच्या थंडी पासून बचाव करण्यासाठी हातात पायात मोजे तसेच शरीरावर उबदार कपडे परिधान करावे. शक्य असल्यास दुधाने अंघोळ करावे:- दुधाने अंघोळ केल्यास त्वचेवरील खाज नाहीशी होते त्यामुळे शक्य असल्यास दुधाने अंघोळ करावी म्हणजेच दुधामध्ये कापड भिजवून त्याने पूर्ण शरीर स्वच्छ करावे. नैसर्गिक तेलाचा वापर करावे:- नैसर्गिक तेल जसे की, ऑलिव्ह ऑईल, नारळ तेल यांचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करावे त्यामुळे तुमच्या चिडलेल्या त्वचेला शांत करण्यास मदत होते. पेट्रोलियम जेलीचा वापर करावे:- पेट्रोलियम जेली देखील तुमच्या त्वचेवरील ओलावा राखून ठेवण्यात मदत होते त्यामुळे तुम्ही पेट्रोलियम जेलीचा वापर करू शकता परंतु जर तुम्हाला पेट्रोलियम जेलीचा वापर करणे आवडत नसेल तर तुम्ही वॅक्सेलन किंवा अन्य पेट्रोलियम युक्त प्रॉडक्ट्स चा वापर करावे. तुम्हाला पुरळ ची समस्या जास्तच वाढली असेल तर तुम्ही आमच्या Inamdar Multi-Specialist Hospital, Pune इथे नक्कीच एकदा भेट देऊन बघा. आम्ही तुम्हाला इष्टतम दरात उत्तोमत्तम आरोग्यसेवा देऊ. आमच्या Hospital मध्ये केंद्रशासित आणि अत्याधिक सुविधांसह प्रसिद्ध डॉक्टरांची टीम आहे. आमच्या Hospital चा पत्ता सर्वे नं. 15, Kpct मॉल च्या मागे, फातिमा नगर, वानवडी, पुणे, पिन कोड नं. 411040 अधिक माहिती साठी आमच्या हॉस्पिटल च्या https://inamdarhospital.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. Conclusion तर मित्रांनो, हिवाळ्यातील पुरळांपासून मुक्त कसे व्हावे या article च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पुरळ काय असते? त्याची कारणे काय आहेत? तसेच त्यांच्यापासून मुक्तता कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. प्रस्तुत article तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला Comment box च्या माध्यमातून नक्कीच कळवा तसेच आवडल्यास share करायला विसरू नका.
हिवाळ्यातील पुरळांपासून मुक्त कसे व्हावे(How to Get Rid of Winter Acne in Marathi) Read More »