Inamdar Hospital

Skin Treatment in Pune

हिवाळ्यातील पुरळांपासून मुक्त कसे व्हावे(How to Get Rid of Winter Acne in Marathi)

संपूर्ण वर्ष जरी का तुमच्या शरीराची त्वचा ही निरोगी राहत असली तरी देखील वातावरणातील जस जसा तापमान कमी होत जातो आणि हिवाळा म्हणजे थंडी येत जाते त्यामुळे तुमच्या त्वचेवरील(Skin) आद्रता कमी होत जाते आणि त्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडत जाते. त्यामुळे सहसा थंडी मध्ये जास्त प्रमाणात त्वचेचे रोग होत असतात. त्यातलाच एक पुरळ नामक रोग आपल्या त्वचेला होत असते. तर आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की, त्या पुरळ ला नाहीसे कसे करावे? तर काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी हिवाळ्यातील पुरळांपासून(acne)मुक्त कसे व्हावे या article च्या माध्यमातून सांगणार आहोत की, तुमच्या त्वचेवरील पुरळ नाहीसे कसे करावे. करीता आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो की, प्रस्तुत article सुरवाती पासून ते शेवटपर्यंत नक्की वाचा. पुरळ म्हणजे काय? – पुरळ मध्ये नेमके काय होते(What is a rash? – What exactly happens in a rash) पुरळ हा त्वचा रोग आहे जो आपल्या शरीराच्या त्वचे वरील आद्रता कमी झाल्यामुळे होत असते. आता पुरळ मध्ये नेमके काय होते ते आपण त्यांची लक्षणे पाहून समजून घेऊया. त्वचेवर लालसरपणा येणे त्वचेवर सूज येणे त्वचेला खाज सुटणे त्वचा सोलणे त्वचा संवेदनशील होणे वरील सांगितलेले लक्षण तुमच्या शरीरावर दिसू लागले तर समजून जायचं की तुम्हाला पुरळ झालेले आहे. हिवाळ्यात पुरळ येण्याची काय कारणे आहेत(What are the causes of winter rash in marathi)? तुम्हाला पुरळ काय आहे आणि पुरळ झाल्यावर नेमके काय होते हे तर समजलेले आहे परंतु नेमका हिवाळ्यामध्ये हे पुरळ का होते हे आपण आता त्यांची काही संभाव्य कारणे वाचून तुम्हाला समजेल की पुरळ हिवाळ्यामध्ये का होते? आपल्या त्वचेवर नैसर्गिक तेल आणि मृत त्वचेच्या पेशी असतात यामुळे आपली त्वचा ही मऊ आणि गुळगुळीत राहते परंतु बाहेरच्या वातावरणातील कमी आद्रता, थंड हवा तसेच वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे नैसर्गिक तेल आणि मृत त्वचेच्या पेशा काढून टाकतात त्यामुळे आपल्या त्वचेवरील ओलावा नष्ट होते. आणि त्यामुळे आपल्याल पुरळ होत असते. याशिवाय आणखी काही संभाव्य कारणे आहेत ज्यामुळे पुरळ होत असते ते खालील प्रमाणे आहेत. आपल्याला वारंवार येणारा थकवा आणि वाढत्या ताणामुळे आपल्याला पुरळ होण्याची शक्यता असते. कित्येकदा आपल्याला असणाऱ्या एखाद्या प्रकारच्या ऐलर्जी मुळे देखील पुरळ होण्याची शक्यता असते. जीवाणूंचा संसर्ग झाल्यामुळे देखील पुरळ होण्याची शक्यता असते. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ जसे की, साबण, दुर्गंधीनाशक साबण, डिटर्जंट किंवा इतर रसायन मुळे देखील आपल्याला पुरळ होण्याची शक्यता असते. जिवाणू किंवा जंतू यांच्या वाढत्या संसर्गामुळे देखील आपल्याला पुरळ होण्याची शक्यता असते. आता तुम्हाला माहिती झाले की, पुरळ म्हणजे नेमके काय होते आणि पुरळ होण्यामागील कारण तर समजलेले आहेतच परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे तर समजलेच परंतु या पुरळांना नाहीसे कसे करायचे? तर काळजी करू नका आम्ही तुम्हाला सर्व माहिती सांगतो. हिवाळ्यातील पुरळांपासून मुक्त कसे व्हावे(How to get rid of winter acne in marathi) हिवाळ्यामध्ये होणाऱ्या पुरळ पासून मुक्त होण्यासाठी खालील प्रमाणे काही उपाय सांगितलेले आहेत ते जर तुम्ही पाळले तर तुमची पुरळांपासून मुक्तता नक्कीच होईल याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. अंघोळी नंतर मॉइश्चरायझ करावे:- रसायनयुक्त नसणारे काही मॉइश्चरायझर असतात त्यांचा वापर करून नियमितपणे अंघोळ झाल्यानंतर त्यांचा वापर करावे ज्यामुळे तुमच्या शरीरावर ओलावा राखून ठेवला जाते. कोमट पाण्याने अंघोळ करावे:- गरम पाण्याने अंघोळ करू नये त्यामुळे शरीरावरील नैसर्गिक तेल काढून घेते त्यामुळे नेहमी कोमट पाण्याने अंघोळ करावी. पूर्ण कपडे परिधान करावे:- हिवाळ्याच्या थंडी पासून बचाव करण्यासाठी हातात पायात मोजे तसेच शरीरावर उबदार कपडे परिधान करावे. शक्य असल्यास दुधाने अंघोळ करावे:- दुधाने अंघोळ केल्यास त्वचेवरील खाज नाहीशी होते त्यामुळे शक्य असल्यास दुधाने अंघोळ करावी म्हणजेच दुधामध्ये कापड भिजवून त्याने पूर्ण शरीर स्वच्छ करावे. नैसर्गिक तेलाचा वापर करावे:- नैसर्गिक तेल जसे की, ऑलिव्ह ऑईल, नारळ तेल यांचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करावे त्यामुळे तुमच्या चिडलेल्या त्वचेला शांत करण्यास मदत होते. पेट्रोलियम जेलीचा वापर करावे:- पेट्रोलियम जेली देखील तुमच्या त्वचेवरील ओलावा राखून ठेवण्यात मदत होते त्यामुळे तुम्ही पेट्रोलियम जेलीचा वापर करू शकता परंतु जर तुम्हाला पेट्रोलियम जेलीचा वापर करणे आवडत नसेल तर तुम्ही वॅक्सेलन किंवा अन्य पेट्रोलियम युक्त प्रॉडक्ट्स चा वापर करावे. तुम्हाला पुरळ ची समस्या जास्तच वाढली असेल तर तुम्ही आमच्या Inamdar Multi-Specialist Hospital, Pune इथे नक्कीच एकदा भेट देऊन बघा. आम्ही तुम्हाला इष्टतम दरात उत्तोमत्तम आरोग्यसेवा देऊ. आमच्या Hospital मध्ये केंद्रशासित आणि अत्याधिक सुविधांसह प्रसिद्ध डॉक्टरांची टीम आहे.  आमच्या Hospital चा पत्ता सर्वे नं. 15, Kpct मॉल च्या मागे, फातिमा नगर, वानवडी, पुणे,  पिन कोड नं. 411040 अधिक माहिती साठी आमच्या हॉस्पिटल च्या https://inamdarhospital.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. Conclusion तर मित्रांनो, हिवाळ्यातील पुरळांपासून मुक्त कसे व्हावे या article च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पुरळ काय असते? त्याची कारणे काय आहेत? तसेच त्यांच्यापासून मुक्तता कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. प्रस्तुत article तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला Comment box च्या माध्यमातून नक्कीच कळवा तसेच आवडल्यास share करायला विसरू नका.

हिवाळ्यातील पुरळांपासून मुक्त कसे व्हावे(How to Get Rid of Winter Acne in Marathi) Read More »

Do’s and Don’ts for Preventing Measles

Measles is a highly contagious viral disease that can cause severe health complications, especially in young children, pregnant women, and people with weakened immune systems. Fortunately, measles can be prevented with proper vaccination and following certain dos and don’ts. In this blog, we’ll discuss the do’s and don’ts for preventing measles at Inamdar Multispeciality Hospital. Do’s for Preventing Measles Get Vaccinated: The most effective way to prevent measles is to get vaccinated. The MMR vaccine (measles, mumps, and rubella) is recommended for children at 12 to 15 months of age and a second dose at 4 to 6 years of age. Adults who have not been vaccinated should get at least one dose of the vaccine. Cover Your Mouth and Nose: If you have measles or are exposed to someone with measles, cover your mouth and nose when you cough or sneeze. This will help prevent the spread of the virus. Practice Good Hygiene: Wash your hands frequently with soap and water, especially before eating or touching your face. Use hand sanitizer when soap and water are not available. Stay Home: If you have measles, stay home until your fever subsides and the rash disappears. This will help prevent the spread of the virus to others. Keep Your Environment Clean: Clean and disinfect frequently touched surfaces and objects, such as doorknobs, light switches, and toys. Don’ts for Preventing Measles Don’t Share Personal Items: Do not share personal items such as utensils, cups, towels, or toothbrushes with others. This can spread the virus. Don’t Touch Your Face: Avoid touching your face, especially your eyes, nose, and mouth. The virus can enter your body through these areas. Don’t Come into Contact with Infected People: Avoid close contact with people who have measles. If you must be around someone with measles, wear a mask and wash your hands frequently. Don’t Travel to Outbreak Areas: If there is a measles outbreak in your area, avoid traveling to areas where the outbreak is occurring. Don’t Ignore Symptoms: If you develop symptoms of measles, such as a high fever, cough, runny nose, and rash, seek medical attention immediately. Inamdar Multispeciality Hospital Inamdar Multispeciality Hospital takes measles prevention seriously and follows strict protocols to prevent the spread of the virus. Patients who are suspected of having measles are immediately isolated, and healthcare workers take precautions to avoid exposure to the virus. The hospital also provides vaccination services to prevent the spread of the disease. Conclusion In conclusion, preventing measles requires a combination of vaccination, good hygiene, and avoiding contact with infected people. By following these simple dos and don’ts, you can protect yourself and others from this highly contagious disease. At Inamdar Multispeciality Hospital, we are committed to providing the highest level of care and support to our patients in preventing and treating measles.

Do’s and Don’ts for Preventing Measles Read More »

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी(How to Take Care of Skin in Summer in Marathi)?

मित्रांनो, आता हिवाळ्यातील गुलाबी किंवा बोचरी थंडी कमी होऊन उन्हाळ्याचे वेध हळूहळू लागत आहेत. आपण जशी थंडीमध्ये आपल्या त्वचेची काळजी घेत असतो, तशीच उन्हाळ्यात सुद्धा त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. तसे न केल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चला तर बघू या, घरच्या घरी आपण त्वचेची काळजी(Skincare) कशी घेऊ शकतो व आपली त्वचा कशी टवटवीत व निरोगी ठेवू शकतो. उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घावी यावर १५+ टिप्स उन्हाळ्यात त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्रमाणात पिणे आवश्यक आहे. तसेच आहारात पाणीदार फळांचा समावेश असावा. त्वचेची काळजी कशी घ्यावी यासाठी तुम्हाला तुमचा त्वचा प्रकार माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य उपाययोजना करून त्वचेची होणारी हानी टाळता येते. डोळ्यांखालची काळी वर्तुळे कमी करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करावा. उन्हात सतत काम पडत असेल, तर दर २ तासांनी सनस्क्रीनचा वापर करू शकतो. त्वचा प्रकारानुसार योग्य ते स्क्रब वापरून त्वचेवरील डेड स्कीन काढून टाकल्यास त्वचा जास्त टवटवीत दिसू लागते. १५ दिवसांतून एकदा त्वचा एक्सफोलिएट करून घ्यावी.  उन्हाळ्यात शक्यतो सुती, मुलायम व सैल कपड्यांचा वापर करावा. उन्हाळ्यात अनेकदा अंगाला घामाचा वास येत असतो. हे टाळण्यासाठी दररोज आंघोळीच्या पाण्यात २ थेंब इसेन्शिअल तेल टाकून आंघोळ करावी. व्हिटॅमिन सी युक्त क्रीम, पावडर यांचा वापर करावा. दररोज एक वेळा सी. टी. एम. करावे. सी. टी. एम. म्हणजे क्लिनसिंग, टोनिंग व मॉइश्चरायझिंग. क्लिनसिंग – चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवावा. टोनिंग – चेहरा गुलाबजलने स्वच्छ धुवावा. मॉइश्चरायझिंग – मॉइश्चरायझर लावावे.  नैसर्गिक उत्पादनांचा वापर करावा. फळांचा लेप चेहर्यावर २० मिनिटे लावून ठेवावा व नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. केमिकलयुक्त उत्पादनांमुळे इतर त्वचा विकारांचा धोका उद्भवू शकतो. कोमट पाण्याने आंघोळ करावी. खूप गरम पाणी वापरल्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. डोळ्यांची होणारी जळजळ टाळण्यासाठी डोळ्यांवर थंड पाण्याची पट्टी किंवा काकडीचे तुकडे यांचा वापर करावा. बर्फाचे तुकडे एका कापडात ठेऊन त्वचेवर ठेवल्यास त्वचा शांत व थंड होण्यासाठी मदत होते. घामोळ्या व पुरळ यापासून बचाव करण्यासाठी आहारात दही, ताक अशा पदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा. चेहरा दिवसातून २ वेळा स्वच्छ पाण्याने किंवा फेसवॉशने धुऊन काढावा. शक्यतो वॉटर बेस्ड मेकअपचा वापर करावा किंवा कमीत कमी मेकअप असावा. उन्हाळ्यात मेकअप शक्यतो टाळावा. आहार व व्यायामासोबत पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आद्रता संतुलित राहते व चेहरा सतेज दिसतो. तर मित्रांनो, वरील पद्धतीने आपण आपल्या त्वचेची योग्यरीत्या काळजी घेऊ या आणि येणार् उन्हाळ्याला सुसह्यपणे सामोरे जाऊ या. Inamdar Multispeciality Hospital पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल   (Inamdar Multispecialty Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते.पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी(How to Take Care of Skin in Summer in Marathi)? Read More »