मणक्याच्या चकती वरील शस्त्रक्रिया
आपल्या पाठीच्या मणक्यांची विशिष्ट रचना असते. या मणक्याच्या रचनेत पाठीच्या मणक्यांची हाडे एकमेकांवर साखळीप्रमाणे विशिष्ट पद्धतीने गुंफलेली असतात. या दोन हाडांच्या मध्ये एक चकती असते. तिला शास्त्रीय भाषेत ‘इंटर व्हर्टिब्रल डिस्क – Inter Vertibral Disk’ असे म्हणतात. म्हणजेच ‘मणक्यातील चकती ‘. पाठीच्या हालचाली, वाकणे, उडी मारणे या क्रियेमध्ये मणक्यांचा दाब shock absorber प्रमाणे सहन करणे, हे या चकतीचे काम असते. ही चकती सरकते अथवा फुटून बाहेर येते (हर्नियेटेड डिस्क(Herniated Disk)) तेव्हा मणक्यामध्ये असणाऱ्या मज्जारज्जूच्या नसांवर दाब येतो. त्यामुळे पायामध्ये वेदना होणे, त्या पाठीपासून पायाकडे सरकणे, मांडीमध्ये वेदना होणे, मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे, पायातील ताकद कमी वाटणे, मलमूत्र विसर्जनावरील नियंत्रण कमी होणे, यासारखी लक्षणे आढळून येतात. तज्ज्ञ डॉक्टर रुग्णाचे परीक्षण करून पाठीच्या मणक्याचे एक्स रे (X-Ray), एमआरआय(MRI), गरजेप्रमाणे सिटी स्कॅन (City Scan) करून निदान करतात. या ठिकाणी रुग्णाची लक्षणे, डॉक्टरांना तपासणीमध्ये आढळलेली निरीक्षणे व निदान तपासणीचा अहवालाचा सारासार विचार करूनच शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. मणक्याच्या चकती वरील खालील प्रकारे शस्त्रक्रिया केल्या जातात: १. ओपन डिस्केक्टॉमी (Open Discectomy): पाठीवर छेद घेऊन खराब चकती काढून ही शस्त्रक्रिया केली जाते. २. मायक्रोडिस्केक्टॉमी (Microdiscectomy) : या शस्त्रक्रियेमध्ये सर्जन एका छोट्याशा छेदातून कॅमेरा असलेली ट्यूबनळी घालून परीक्षण करतात व काही विशिष्ट अत्याधुनिक यंत्राच्या मदतीने खराब डिस्क काढली जाते. ३. लंबर लॅमिनेक्टॉमी (Lumbar Laminectomy): काही वेळा मणक्यामधील हाडाचा छोटासा भाग सर्जनला काढावा लागतो. मणक्याच्या या भागाला ‘लॅमिना’ म्हणतात. हा लॅमिना हाडांच्या आवरणातून मज्जारज्जूचे रक्षण करत असतो. खराब चकतीपर्यंत पोचण्यासाठी काही वेळा ही लॅमिनेक्टॉमी करण्याची अवश्यक असते. ४. मणके जोडणे (स्पायनल फ्युजन (Spinal fusion)) : लॅमिनेक्टॉमी (Laminectomy) अथवा डिस्केकटॉमी (Discectomy) नंतर सर्जन काही वेळा मणके जोडण्याची शस्त्रक्रिया करतात त्याला ‘स्पायनल फ्युजन’ म्हणतात. मणक्यांची रचना स्थिर राहण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे असते. दोन हाडांना जोडल्याने ते स्थिर राहिल्याने वेदनाही कमी होतात. ५. आर्टिफिशियल डिस्क रिप्लेसमेंट (Artificial Disc Replacement): खराब चकती काढून त्या ठिकाणी कृत्रिम चकतीचे रोपण केले जाते. ही कृत्रिम चकती मणके स्थिर ठेवण्यास तसेच मणक्याच्या हालचाली सुलभ करण्यात मदत करते.या शस्त्रक्रिया आता ‘मिनिमल इन्व्हेसिव्ह’ पद्धतीने करता येतात. त्यामुळे या शस्त्रक्रियेमध्ये कमीत कमी छेद, कमीत कमी रक्तस्राव, जलद आराम हे फायदे असतात. रुग्ण शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हालचाली करू शकतो. फिजीओथेरपीद्वारा (Physiotherapy) अशा प्रकारच्या मणक्याच्या चकती वरील शस्त्रक्रियांवर सहज मात करता येऊ शकते. इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया केली जाते. पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispeciality Hospital) सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.
मणक्याच्या चकती वरील शस्त्रक्रिया Read More »