बाळंतपणातील सुटलेले पोट (मम्मी टम्मी) आणि पोटपट्टा | Inamdar Hospital

प्रसूतीनंतर अनेक आठवडे पोट मऊ आणि सुजलेले राहते. स्त्रियांना त्यावेळी खूप काळजी वाटते. सुटलेले पोट पुन्हा कमी होईल कि नाही याची काळजी वाटते. पोट इतके मोठे दिसते की असे वाटते की आपण पाच-सहा महिन्यांची गर्भवती आहोत. पण एक लक्षात घ्या की  हे सामान्य आहे. बाळ पोटातून बाहेर आल्यावर वजन कमी होते पण पोट लगेच कमी होत नाही.

तुमचे पोट किती दिवसांत आणि कसे कमी होईल, याला अनेक घटक कारणीभूत असतात. यामध्ये अनुवांशिक घटकांचाही समावेश होतो.गर्भधारणेदरम्यान तुमचे वजन किती वाढले आणि प्रसूतीनंतर तुमची जीवनशैली काय आहे, तुम्ही स्तनपान करत आहात की नाही. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

आपण समजून घेतले पाहिजे की गर्भाशयाची वाढ झाल्यामुळे आपली त्वचा देखील ताणली जाते. हेच कारण आहे की प्रसूतीनंतर फुगलेले पोट कमी करणे खूप कठीण होते. याच मोठ्या पोटाला “मम्मी टम्मी” असे गोड नाव ठेवले आहे.

स्त्रियांना अश्यावेळी अनेक शारीरक आणि मानसिक बदलांचा सामना करावा लागतो. जागरण, सतत स्तनपान , बदललेला आहार यामुळे थकवा आलेला असतो.अश्यातच पोट कमी करायचे त्यांचे प्रयत्न सुरु होतात. गरोदरपणाच्या पूर्ण कालावधीत आईचं वजन कमीत कमी 8 ते 10 किलो वाढतंच. हे खूप नॉर्मल आहे. बाळ झाल्यानंतरही ते वजन फार फारतर 3-3.5 किलो कमी होतं. उरलेलं वजन कमी व्हायला वेळ लागतो, त्यासाठी अजिबात घाई करता कामा नये, असे अनुभवी डॉक्टर सांगतात. आई झाल्यावर स्त्रीवर  घरगुती उपाय करताना अनेक अनुभवी बायकांचे अनेक सल्ले त्यांना मिळत असतात. अशावेळी लवकर पोट कमी करायला लागणारा उपाय म्हणजे ‘पोटपट्टा’ किंवा abdominl binder असेही त्याला म्हणतात.

डिलिव्हरी नंतर सुटलेले पोट फक्त पोटपट्ट्याने फारसे कमी होत नाही. पोटपट्ट्याने पोट दाबले जाते आणि मागे राहते. त्यामुळे स्त्रियांना असे वाटते कि पोट सपाट होणे सुरु झाले आहे. सहसा डॉक्टर नॉर्मल डिलिव्हरी च्या 48 तासानंतर आणि सिझेरियन नंतर 72 तासांनी पट्टा बांधावा असा सल्ला देतात.

या पोट पट्ट्याबरोबर योग्य आहार आणि हलक्या व्यायामाची सांगड असल्यास पोट कमी होते. स्त्री रोग तज्ञांच्या सल्ल्यानेने पोटाचे व्यायाम तुम्ही योग्य वेळी सुरु करू शकता. तसेच शरीरात झालेल्या बदलाचा जास्त ताण न घेता योग्य तज्ञांच्या सल्ल्याने उपचार केल्यास सुटलेले पोट नक्की कमी होऊ शकते. लगेच वजन कमी व्हावं म्हणून काही बायका कडक डाएटिंग किंवा अतिव्यायाम करतात. तेही शरीराला अतिशय घटक ठरू शकत.

म्हणून नेहमी तज्ञांच्या सल्ल्याने उपाय करावेत.

Inamdar Multispeciality Hospital

पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispecialty Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may use these <abbr title="HyperText Markup Language">HTML</abbr> tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

*