पोटफुगी: पोटात गॅस होण्याची कारणे व उपाय
व्यवस्थित आणि योग्य आहार घेतला तर पोटाच्या समस्या जाणवत नाहीत परंतु ज्या व्यक्तींना चुकीचे पदार्थ खाण्याची सवय असते किंवा पदार्थ अवेळी खाण्याची सवय असते, थोडक्यात चुकीचा आहार ज्या व्यक्ती घेतात त्यांना पोटाच्या समस्या जाणवतात. पोटफुगी म्हणजेच पोटामध्ये गॅस जमा होण्याची स्थिती ही एक पोटाची समस्या असून ज्यामुळे अस्वस्थता निर्माण होऊन वेदना जाणवू शकतात.यामुळे जीवनशैलीत बिघाड होऊ शकतो. पोटफुगीची कारणे: अयोग्य आहार : अयोग्य आहार घेणे हे पोटदुखीचे महत्त्वाचे कारण आहे. पोटामध्ये गॅस निर्माण होणारे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे पोटफुगीची समस्या जाणवू शकते. वारंवार आहार घेणे : काही व्यक्ती थोडा थोडा वेळाने सतत अन्नपदार्थ खात असतात किंवा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खाणे, अशावेळी सुद्धा पोट फुगीची समस्या जाणवू शकते. द्रवपदार्थाचे अचूक प्रमाण: कमी पाणी पिणे किंवा पाण्याऐवजी गॅसयुक्त द्रवपदार्थ घेणे, यामुळे सुद्धा पोटफुगीची समस्या जाणवू शकते. पचनसंस्थेतील अडचणी : पचन संस्थेमध्ये काही अडथळे आल्यास जसे की इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS), आहारातील फायबरची कमतरता यामुळे पोटफुगीची समस्या जाणवू शकते. तनाव: मानसिक ताण-तणावामुळे सुद्धा पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतात, त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा तणाव कमी प्रमाणामध्ये घेणे किंवा न घेणे हे संपूर्ण शरीरासाठीच फायदेशीर आहे. एलर्जी किंवा असहिष्णुता ( Allergy or intolerance ) : लॅक्टोज, ग्लूटन यांसारख्या खाद्यपदार्थांवर असहिष्णुता असणे किंवा एलर्जी असणे यामुळे सुद्धा पोटाच्या समस्या जाणवू शकतात. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ : हल्ली मार्केटमध्ये खूप सारे प्रोसेसड फुड म्हणजेच प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत आणि काही लोकांना हे खाद्यपदार्थ जास्त प्रमाणामध्ये खाण्याची सवय असते, अशा प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थामुळे पोटफुगीची समस्या जाणवू शकते. तसेच जंक फूड किंवा फास्ट फूड खाणे टाळावे. अपचन : आपण जो काही आहार घेतो तो आहार व्यवस्थित रित्या न पचल्यास म्हणजेच अपचन झाल्यास पोटफुगी होऊ शकते. धूम्रपान : धूम्रपान हे संपूर्ण शरीरासाठीच हानिकारक आहे. सिगारेटचा धूर फुफ्फुसांसोबतच पचन तंत्रासाठी सुद्धा हानिकारक आहे. धूम्रपान करत असताना धूर शरीराच्या आत मध्ये गिळला जातो आणि त्यामुळे पचनतंत्र बिघडते आणि पोटफुगी होऊ शकते. अल्कोहोल : अधिक प्रमाणामध्ये अल्कोहोलचे सेवन केल्यामुळे यकृत तसेच स्वादुपिंडा सारख्या पचनात्मक अंगाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप होतो आणि त्यामुळे अन्न पचनावर परिणाम होऊन पोटफुगीची समस्या जाणवू शकते. पाणी साचणे : जास्त प्रमाणामध्ये मीठ किंवा साखर खाल्ल्यामुळे शरीरामध्ये, पोटात पाणी साचले जाते आणि त्यामुळे पोटफुगीची समस्या जाणवू शकते. जिवाणूंच्या संख्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ : जर अमाशयातील जिवाणू आतडीमध्ये जास्त प्रमाणात वाढायला लागले तर मोठ्या प्रमाणामध्ये वायू निर्माण करतात आणि त्यामुळे पोटफुगीची समस्या जाणवू शकते. पोटफुगीवर उपाय: आहारात बदल : गॅस निर्माण करणारे खाद्यपदार्थ खाणे कमी करावे. फायबरयुक्त आहार खावा जसे की संपूर्ण धान्य, भाज्या आणि फळे. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे: दररोज 8-10 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. योग्य प्रमाणामध्ये पाणी पिल्यामुळे आपले शरीर हायड्रेटेड राहते. खाण्याच्या सवयी मधील बदल: थोड्या थोड्या प्रमाणात खावे आणि अन्न चावून चावून खावे, अन्न व्यवस्थित रित्या खाल्ल्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होते परिणामी पोटामध्ये गॅस होत नाही आणि पोटफुगीची समस्या जाणवत नाही. व्यायाम करावा: नियमित व्यायाम, विशेषतः चालणे, योग किंवा अन्य शारीरिक क्रिया करणे शरीरासाठी फायदेशीर आहे. व्यायाम केल्यामुळे पोटाच्या समस्या किंवा इतर कुठल्याही समस्या जाणवत नाही किंवा जाणवल्या तरी कमी प्रमाणात जाणवतात. तनाव व्यवस्थापन : ध्यान, प्राणायाम किंवा इतर तंत्रांचा उपयोग करून मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा , तणाव व्यवस्थापन एकंदरीतच आपल्या संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे. औषधे : जर तुम्हाला वेळोवेळी अपचनाच्या समस्या किंवा पोटाच्या समस्या जाणवत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेऊ शकता. तज्ञांचा सल्ला: पोटाच्या समस्या दीर्घकाळ जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पोटफुगी वर आयुर्वेदिक उपाय : पोट फुगी वर विविध आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहेत परंतु अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने किंवा खात्रीशीर उपाय असेल तरच प्रयोग करावा. पोटफुगी कमी करणारी काही पदार्थ : बेकिंग सोडा, ॲपल साइडर विनेगर, डिटॉक्स वॉटर, भोपळा, केळी, ग्रीन टी, आले, बडीसोप, पुदिना, एलोवेरा अशा पदार्थांचे सेवन तुम्ही वेळोवेळी करू शकता. पोटफुगी टाळावी : पोट फुगी टाळण्यासाठी धूम्रपान तसेच मद्यपान करणे थांबवा, जंक फूड किंवा फास्ट फूड खाणे बंद करू शकता, जेवणासोबत पाणी पिणे टाळा, नियमित योगा किंवा व्यायाम करा, साखर व मीठ कमी प्रमाणामध्ये वापरा, निरोगी आहार घ्या,योग्य प्रमाणात पाणी प्या. पोटफुगी एक सामान्य समस्या असली तरी तिचा उपचार वेळीच करणे आवश्यक आहे. योग्य आहार, जीवनशैलीत काही बदल, आणि योग्य उपचारामुळे आपण या समस्येवर नियंत्रण ठेवू शकतो. तुमच्या जीवनशैलीत छोटे बदल करून तुम्ही पोटफुगीपासून सुटका मिळवू शकता. तुम्हाला पोटासंबंधी काही समस्या असल्यास तुमच्या स्थानिक डॉक्टरांशी संपर्क साधू शकता किंवा इनामदार हॉस्पिटल येथे संपर्क साधू शकता.
पोटफुगी: पोटात गॅस होण्याची कारणे व उपाय Read More »