Inamdar Hospital

MRI आणि CT Scan मधील मुख्य फरक

MRI आणि CT Scan मध्ये काय अंतर आहे?

आपल्यापैकी बऱ्याच जणांना डॉक्टर कडे गेल्यानंतर काही आजार असल्यास त्या – त्या कारणांसाठी सिटीस्कॅन किंवा एमआरआय करण्याचा सल्ला दिलेला असू शकतो परंतु काही लोकांना सिटीस्कॅन आणि एमआरआय मध्ये नक्की फरक काय याबाबत माहिती नाही. आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात विविध प्रकारच्या इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळे डॉक्टरांना रोगांचे निदान करण्यास मदत होते. MRI (Magnetic Resonance Imaging) आणि CT Scan (Computed Tomography) हे दोन लोकप्रिय इमेजिंग तंत्र आहेत, परंतु त्यांच्यात काही महत्त्वाचे फरक सुद्धा आहेत. तर आज आपण एम आर आय आणि सिटीस्कॅन मध्ये नक्की काय फरक आहे हे जाणून घेणार आहोत.

MRI आणि CT Scan मध्ये काय फरक आहे :

MRI (Magnetic Resonance Imaging) | मॅग्नेटिक रेजोनन्स इमेजिंग –

तंत्रज्ञान:

– MRI मध्ये शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र आणि रेडिओ लहरींचा वापर केला जातो. यामुळे शरीरातील एम आर आय चुंबक आणि रेडिओ तरंगांचा उपयोग करून सामान्य आणि रोगग्रस्त ऊतींमध्ये फरक करू शकतात आणि वैद्यकीय निदानासाठी महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून देतात.

प्रतिमा गुणवत्ता:

– MRI उच्च गुणवत्तेच्या मऊ ऊतकांचे जसे की मेंदू, स्नायू, हृदय प्रतिमा घेण्यात सक्षम आहे. तसेच अस्थिबंधन पाठीचा कणा यामध्ये विशिष्ट उती आणि विकृतींच्या इमेजिंग साठी एम आर आय स्कॅन महत्वपूर्ण ठरते.

साइड इफेक्ट्स :

– MRI मध्ये कोणतेही रेडिएशन वापरले जात नाही, त्यामुळे ते सुरक्षित आहे. परंतु, काही लोक मशीनच्या जागेमध्ये असताना घाबरू शकतात किंवा एमआरआय करण्यापूर्वी सुद्धा काही लोक घाबरतात परंतु काळजी करण्यासारखं काहीही नाही, एमआरआय करण्यापूर्वी योग्य त्या सूचना केल्या जातात.

उपयोग :

– मऊ ऊतकांचे, स्नायूंचे, आणि सटीक संरचनांचे चित्रण करण्यासाठी MRI चा उपयोग केला जातो. एम आर आय हे विशेषतः न्यूरोलॉजी आणि ऑर्थोपेडिक्समध्ये अधिक उपयुक्त आहे.

एमआरआय प्रक्रियेसाठी लागणारा वेळ :

एमआरआय प्रक्रियेसाठी साधारणपणे 45 मिनिटे ते 1 तास लागू शकतो.

एमआरआय चा उपयोग पुढील तपासणी आणि निदानासाठी केला जाऊ शकतो :

  • ट्यूमर
  • स्तनांचा कर्करोग
  • सांधे आणि अस्थिबंधन यामध्ये जखम किंवा विकृती असल्यास
  • मेंदूशी संबंधित काही समस्या असल्यास
  • रक्तवाहिन्याशी संबंधित समस्या असल्यास
  • यकृताचे विकार असल्यास
  • हाडांशी संबंधित विकार असल्यास
  • पाठीच्या कण्याच्या समस्या असल्यास

CT Scan (Computed Tomography) | सिटीस्कॅन –

तंत्रज्ञान :

– CT Scan मध्ये क्ष किरणांचा वापर केला जातो, ज्यामुळे शरीराचे क्रॉस-सेक्शनल इमेजेस तयार होतात. विविध कोनांवर घेतलेल्या क्ष किरणांचा वापर करून, संगणक विविध स्तरांवर इमेजेस तयार करतो. शरीरामधील अवयव ,हाडे तसेच उतींच्या अत्यंत डिटेल इमेजेस तयार करण्यासाठी सिटीस्कॅनमध्ये क्ष किरणांचा उपयोग केला जातो. सिटीस्कॅन हाडांमधील फ्रॅक्चर, अवयवातील ट्युमर, फुफ्फुसांचा न्यूमोनिया अशा परिस्थितीमध्ये हाडे आणि मऊ ऊती या दोन्हींमधील विकृती शोधण्यामध्ये सक्षम आहे.

प्रतिमा गुणवत्ता :

– CT Scan हाडे आणि कठीण ऊतकांचे चित्रण करण्यासाठी उत्कृष्ट आहे.तातडीच्या परिस्थितीमध्ये सिटीस्कॅन अत्यंत स्पष्ट अशा प्रतिमा देतो. सिटीस्कॅन अगदी काही सेकंदामध्ये मानेपासून ते मांड्यांपर्यंत संपूर्ण शरीराची प्रतिमा कॅप्चर करू शकतो.

साइड इफेक्ट्स :

– CT Scan मध्ये क्ष किरणांचा वापर असल्यामुळे, यामध्ये कमी प्रमाणात रेडिएशन असते. म्हणून डीएनए खराब होण्याचा तसेच कर्करोग होण्याचा धोका कमी असतो.

उपयोग :

– CT Scan आघात, कर्करोग, आणि आंतरिक जखमांचे निदान करण्यासाठी वापरला जातो. सिटीस्कॅन अत्यंत जलद आणि प्रभावी आहे.

सिटीस्कॅन प्रक्रियेसाठी लागणारा वेळ :

सिटीस्कॅन प्रक्रियेसाठी साधारणतः 10 ते 20 मिनिटांपर्यंत कालावधी लागू शकतो.

सिटीस्कॅन पुढील तपासणी आणि निदान करण्यासाठी उपयोगात आणले जाऊ शकते :

  • किडनीचे विकार जसे की किडनी रोग किंवा किडनीतील ट्युमर
  • रक्ताभिसरणशी संबंधित समस्या असल्यास
  • ओटी पोटाशी संबंधित समस्या असल्यास
  • डोक्याला दुखापत असल्यास
  • फुफ्फुसांशी संबंधित समस्या असल्यास
  • मुत्रामध्ये रक्त उपस्थिती असल्यास

MRI आणि CT Scan मधील मुख्य फरक

घटक MRI CT Scan
तंत्रज्ञान चुंबकीय क्षेत्र आणि रेडिओ तरंग एक्स-रे
प्रतिमा गुणवत्ता मऊ ऊतकांचे उच्च गुणवत्तेचे चित्रण कठीण ऊतकांचे स्पष्ट चित्रण
साइड इफेक्ट्स सुरक्षित, रेडिएशन नाही कमी प्रमाणात रेडिएशन
उपयोग न्यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स आघात, कर्करोग
प्रक्रियेसाठी लागणारा वेळ साधारणपणे 45 मिनिटे ते 1 तास 10 ते 20 मिनिटांपर्यंत
उपवास आवश्यकता उपवास करणे आवश्यक नाही. जर रुग्णाला कॉन्ट्रास्टसह सीटी स्कॅन होत असेल, तर त्याला स्कॅनच्या 3 तास आधी उपवास करावा लागू शकतो.

MRI आणि CT Scan दोन्ही वैद्यकीय इमेजिंग तंत्रज्ञानामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. कोणते तंत्र वापरायचे हे रोगाच्या स्थितीवर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आणि आवश्यकतेनुसार ठरवले जाते. योग्य इमेजिंग तंत्र वापरल्याने डॉक्टरांना अचूक निदान करण्यास आणि उपचार योजना तयार करण्यात मदत होते. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत काही प्रश्न असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमी योग्य ठरते. तुम्हाला काही प्रश्न असतील तर इनामदार हॉस्पिटल येथे Radiology Department मध्ये संपर्क करू शकता. Contact NO. 7722030082