Inamdar Hospital

Cancer hospital in pune

या 4 कारणांमुळे कमी वयात वाढतोय कॅन्सरचा धोका

जगभरात कॅन्सर च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार भारतात गेल्या 10 वर्षांत कॅन्सर च्या रुग्णांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात कॅन्सर ने ग्रस्त 10 पैकी 6 लोकांचा मृत्यू होतो. या आजाराची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. ICMR ने आपल्या अहवालात असे म्हटले आहे की पुढील पाच वर्षांत देशातील कॅन्सर च्या रुग्णांची संख्या 12 टक्क्यांनी वाढू शकते. लहान वयातही या आजाराची प्रकरणे समोर येत आहेत ही फार चिंतेची बाब आहे. या प्राणघातक आजाराची प्रकरणे वाढण्याची मुख्य चार कारणे आहेत. ते आपण आजच्या या आर्टिकल च्या माध्यमातून पाहूया. या 4 कारणांमुळे कमी वयात वाढतोय कॅन्सरचा धोका द लॅन्सेट यांच्या अभ्यासात असे म्हटले आहे की लहान वयात कॅन्सर होण्याची चार मुख्य कारणे आहेत.  वाईट जीवनशैली – Bad Lifestyle बिघडलेल्या जीवनशैलीमुळे प्रोस्टेट कॅन्सर, थायरॉईड कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणे झपाट्याने वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे. हल्लीची तरुण पिढी लवकर झोपत नाही ज्यामुळे त्यांची झोप बरोबर होत नाही आणि ते त्यांच्या जीवनशैलीत कसल्याही प्रकारच्या हालचाली करीत नाही ज्यामुळे कमी वयातच कॅन्सर सारखा आजार होण्याचा धोका वाढू शकतो. लोकांच्या जीवनात मानसिक तणावही खूप वाढला आहे. पूर्वी हा आजार फक्त वृद्धांमध्येच जास्त दिसून यायचा परंतु हल्ली तर 30 ते 40 वयोगटातील लोकांना सुद्धा हा आजार होण्याच्या घटना समोर येत आहेत. चुकीच्या खाण्याच्या सवयी – Bad Eating Habits लहान वयातच कॅन्सरची प्रकरणे वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी होय. फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ यांच्या वाढत्या ट्रेंडमुळे कॅन्सर होत आहे. जास्त प्रमाणात मांस खाणे आणि प्लास्टिकच्या वस्तूंमधील पाणी पिणे यामुळेही हा आजार वाढत आहे. कारण तुमच्या माहिती करिता आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, प्लास्टिकमध्ये असे कित्येक प्रकारचे घातक रसायने असतात जी आपल्या खाण्या पिण्यामध्यन शरीरात जातात आणि ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. वाढती लठ्ठपणाची समस्या – A Growing Obesity Problem लहान वयात कॅन्सर होण्यामागचे तिसरे प्रमुख कारण म्हणजे वाढती लठ्ठपणाची समस्या. फक्त भारत या देशामध्येच नाही तर संपूर्ण जगातील अनेक वेग वेगळ्या देशांमध्ये देखील या लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. शरीराचा High BMI कॅन्सर ला निमंत्रण देत आहे. अशा स्थितीत शरीर तंदुरुस्त ठेवणे खूप गरजेचे आहे. BMI वाढत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दिवसातून किमान अर्धा तास व्यायाम करायला हवा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. धूम्रपान आणि मद्य सेवन – Smoking and Alcohol Consumption सध्या तरुणांमध्ये धूम्रपान आणि दारूचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक तरुण हे फार व्यसनाधीनही झाले आहेत. सिगारेटचे जास्त सेवन केल्याने फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. दारूमुळे यकृत आणि पोटाच्या कॅन्सर ची प्रकरणे नोंदवली जात आहेत.

या 4 कारणांमुळे कमी वयात वाढतोय कॅन्सरचा धोका Read More »

कर्करोगाची गाठ दुखते का? (Does a Cancer Tumor Hurts in Marathi )

देशात कर्करोगाची गाठ(cancerous tumor) प्रमाण वाढत आहे. सर्व वयोगटातील लोक या आजाराला बळी पडत आहेत. दरम्यान, अनेकजण गोंधळालाही बळी पडत आहेत. शरीरात कुठेही गाठ निर्माण झाली की त्याला कॅन्सरची भीती वाटते. स्त्री किंवा पुरुष अनेक दिवस तणावाखाली राहतात. वस्तुस्थिती उलट आहे, फक्त 10 टक्के गाठ कर्करोगाच्या असतात. त्याच वेळी, 90 टक्के गाठ किंवा गुठळ्यांमध्ये कर्करोगाच्या पेशी आढळत नाहीत. या गाठी होण्याची इतर विविध कारणे असू शकतात. त्वचेखालील बहुतेक गाठी आणि सूज निरुपद्रवी (Harmless)असतात.. तथापि, जर तुमच्या शरीरात नवीन गाठ किंवा सूज आली असेल, तर त्याचे कारण शोधण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.एक किंवा दोन दिवसांत अचानक उद्भवणारी गाठ किंवा सूज दुखापत किंवा संसर्गामुळे असू शकते. जर गाठीच्या सभोवतालची त्वचा लाल आणि गरम असेल तर ते संक्रमण असू शकते. तुमची गाठ किंवा सूज कशामुळे होत असेल याची तुम्हाला फक्त कल्पना येऊ शकते. जरी असे झाले तरी काळजी घ्या आणि कृपया स्वत: निदानासाठी वापरू नका. नेहमी योग्य काळजी कशी घ्यावी यासाठी योग्य डॉक्टराचा सल्ला देऊ शकतात. कर्करोगाची गाठ वेदना देते का? (Does a cancerous tumor cause pain) अनेक प्रकरचे कर्करोग असतात. त्यातील बहुतेक कर्करोग हे गाठीपासूनच सुरू होतात. सुरुवातीला गुठळी लहान असते आणि त्यात वेदना होत नाहीत, मग लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण त्याकडे दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांकडून तपासणी करून योग्य उपचार केले पाहिजेत. तुमची गाठ कोणत्या प्रकारची आहे हे तपासून घ्या. ती जर वेदनादायक, लाल आहे का ? तुमची गाठ कठीण आहे आणि हलत नाही का ?. तुमची गाठ २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकते. एक गाठ गेली तर पुन्हा वाढते अशी लक्षणे दिसल्यास त्वरित योग्य चाचणी करून घ्यावी. शरीराच्या अंतर्गत भागात गाठ असल्यास छाती, पोट, आतडे याशिवाय यकृतावर दाब पडल्याने रुग्णाला भयंकर वेदना होतात. कर्करोगाशी संबंधित वेदना निस्तेज, तीक्ष्ण किंवा अगदी जळजळ असू शकतात. ही वेदना सतत, मधूनमधून, सौम्य, मध्यम किंवा तीव्र असू शकते. एक किंवा दोन दिवसांत अचानक उद्भवणारी गळती किंवा सूज दुखापत किंवा संसर्गामुळे असू शकते. जर गाठीच्या सभोवतालची त्वचा लाल आणि जड असेल तर ते संक्रमण असू शकते. त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल तुमचे डॉक्टर सल्ला देऊ शकतात. विशेषत: स्त्रियांमध्ये असे मानले जाते की स्तनाग्र (nipple) आणि स्तनांमध्ये वेदना हे स्तनाच्या कर्करोगाच्या (Breast Cancer) रुग्णांमध्ये प्रारंभिक लक्षण म्हणून सामान्यपणे दिसते. परंतु प्रत्यक्षात त्याची सुरुवातीची लक्षणे (स्तन कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे) इतकेच नाहीत. स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल जाणवतात. प्रत्येक गाठ ही कॅन्सर वाली नसते तरीही ती कोणती आहे हे तपासून पाहणे आणि डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन घेणे सर्वात उत्तम असते. पुण्यामध्ये इनामदार हॉस्पिटल मध्ये कर्करोगाची गाठ (Cancer Tumor) यावर योग्य पद्धतीने उपचार केले जातात. एकदा अवश्य भेट द्या . पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल(INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करत

कर्करोगाची गाठ दुखते का? (Does a Cancer Tumor Hurts in Marathi ) Read More »

नियंत्रित जीवनशैलीने कर्करोगाची शक्यता(Reduce Cancer Risk?) कामी होते का?

सर्वसामान्यपणे पेशींची अनियंत्रित वाढ झाली की कर्करोग (Cancer ) झाला असण्याची शक्यता असते.पेशींच्या ह्या अवास्तव वाढीतूनच शरीराच्या ठराविक भागात गाठ  तयार होते.मग ही वाढ कुठंही असु शकते. स्वादुपिंड(Pancreas), स्तन, तोंड, मोठे आतडे ,त्वचा. हाडांचा, रक्ताचा कर्करोग सुद्धा होऊ शकतो.ह्या प्राणघातक आजारावर अजूनही पूर्णपणे बरा होईल असे औषध नाही. परंतु लवकर निदान झाले तर तो थोपविता येऊ शकतो.आणि रुग्ण बरा होऊ शकतो. अजूनही त्यावर शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. कर्करोग चा प्रथम आपण ह्या आजाराची ढोबळ लक्षणे बघुया(Symptoms of Cancer) अचानक वजन कमी होणे. लघवीतून रक्त जाणे लवकर बऱ्या न होणाऱ्या जखमा दीर्घ काळ खोकला असणे वारंवार घसा दुखणे स्तनात किंवा कुठेही अचानक पणे गाठ उद्भवणे अन्न गिळताना त्रास होणे वारंवार होणारी पोटदुखी, डोकेदुखी सुद्धा कर्करोगाचे लक्षण असू शकते. आज आपण बघतो विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की संपूर्ण जग जवळ आले आहे. संगणक  आणि जैविक क्षेत्रातील प्रगतीने मानवाचे जीवनच बदलून गेले आहे. ही उत्क्रांती जशी मनुष्याला लाभकारक ठरली तशीच काही हानिकारकही  ठरत आहे. खूप संशोधनाअंती असे दिसून आले आहे की धूम्रपान आणि मद्यपान कर्करोगाचे जरी प्रमुख कारण असले तरी आजकालची बदलती जीवन शैली ही तितकीच कारणीभूत आहे. सततच्या घड्याळाच्या काट्यावर चालण्यामुळे येणार ताण तणाव वातावरणातील वाढणारे प्रदूषण, व्यायामाचा अभाव आणि सकस अन्नाची कमतरता ह्यामुळे देखील ह्या आजाराला निमंत्रण मिळते. हल्ली पार्टी कल्चर  असल्यामुळे तरुणांमध्ये  वेळी अवेळी जागरण, जंक फूडची आवड , बटर चीजचा अतिरिक्त वापर, यामुळे तर तरुण पिढीत  हा आजार झपाट्याने पसरत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. सतत एका जागेवर बसणे लॅपटॉप वर तासनतास काम करणे ह्यामुळे देखील कलोन व स्तनांचा कर्क रोग होऊ शकतो. कधी कधी थोडे दुखले की दुर्लक्ष केले जाते यातूनच कर्करोग दुर्लक्षिला जातो आणि तो कधी लास्ट स्टेजला जातो हे देखील समजत नाही. हल्ली स्वयंपाक घरात वारंवार otg किंवा microwave चा वापर करतात. त्यातील निर्माण होणाऱ्या रेडिएशन(Radiation) मूळे देखील कर्क रोगाची शक्यता वाढते. म्हणूनच जर ह्या आजारापासून बचाव करायचा असेल तर स्वतःसाठी वेळ काढा. एखादा छंद आवड जोपासा त्यामुळे आपोआप ताण दूर होण्यास मदत होईल.  व्यायाम योग करा. ताज्या भाज्या, अंकुरित कडधान्य आणि भरपूर फळांचा आहारात समावेश करा. चौरस आहार आणि योग्य आचार विचार  हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे! पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल   (Inamdar Multispeciality Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

नियंत्रित जीवनशैलीने कर्करोगाची शक्यता(Reduce Cancer Risk?) कामी होते का? Read More »