Inamdar Hospital

020-66812333

9372619219

तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती व ती कशी ओळखायची?

भारतात तोंडाच्या कर्करोगाचे (Oral Cancer) रुग्णाचे प्रमाण ७० टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे. शरीरात जेव्हा पेशींची अचानक पणे अवास्तव वाढ होते तेव्हा कर्करोग होतो. आज  कर्क रोगाच्या अजगराने  पूर्ण दुनियेला विळखा घातला आहे. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे  बदलत चाललेली जीवन शैली, खाण्या-पिण्याच्या सवयी, जंक फूड ,प्रक्रिया केलेल्या  अन्न पदार्थांचे सेवन ,मद्यपान ,धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव  पर्यायाने क्षीण होत चाललेली प्रतिकार शक्ती हे आहे.

जरी या गंभीर आजारावर उपचार शोधून काढले असतील तरी वेळीच आपण ह्याची लक्षणे ओळखली नाही तर क्षणार्धात मृत्यू येवू शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जर ह्या रोगाचे लवकरात लवकर निदान झाले तर हा आजार बरा होवून रुग्णाचे आयुष्यमान वाढवता येवू शकते.

तोंडाच्या कर्करोगाची  लक्षणे काय असतात? (Symptoms of Oral Cancer)

तोंडाचा कर्करोग (Oral Cancer) हा मुख्यतः जीभ, ओठ आणि हिरड्या ह्यांच्या आतील भागांवर होतो. तंबाखू आणि गुटखा  किंवा तत्सम तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्यांमध्ये हा कर्करोग प्रामुख्याने दिसून येतो. लवकर निदान झाल्यास यातून होणारा मृत्यू टाळता येतो.

अशा ह्या आजाराची  लक्षणे खालील प्रकारे :

1) वारंवार तोंड येणे.

2) हिरड्यांना अचानक सूज येणे.

3) घसा खवखवणे.

4) तोंडातून रक्त येणे/ तोंडात रक्तस्त्राव होणे.

5) अन्न चावताना व गिळताना त्रास होणे.

6) तोंडाच्या आतल्या आवरणावर सफेद डाग येणे.

7) तोंड व्यवस्थित बंद न होणे.

8) दात अचानक पणे हिरडीतून सैल होणे.

9) तोंड उघडताना त्रास होणे.

10) जिभेवर लाल / पांढरे डाग दिसणे.

11) कानात वेदना जाणवणे.

12) गळ्यात गाठ होणे.

13) जबडा सुजणे व जबड्याची हालचाल करताना त्रास होणे.

14) ओठांचा बधीर पणा.

15) आवाज बसणे.

16) पाणी पितानाही प्रचंड वेदना होणे.

17) जबड्याची हालचाल करताना त्रास होणे.

18) तोंडातील जखम लवकर बरी न होणे.

19) ही लक्षणे लवकर बरी न होणे.

वरील कोणतीही लक्षणे आढळल्यास तुम्हाला कर्करोगच झाला आहे असे नाही परंतु वेळीच डॉक्टरांचा तज्ज्ञांचा सल्ला घेणे कधीही हितावह ठरते. इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कर्करोग या आजारावर उपचार करणारे तज्ञ डॉक्टर आहेत. त्याची भेट घेऊन योग्य तो सल्ला घ्या.

पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल  हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.