Knee Replacement surgery in Pune | Inamdar Hospital

एखादे मशिन जुने झाल्यावर त्याचे जुने भाग करकरायला लागतात किंवा आवाज करायला लागतात. तसेच आपल्या शरीराचेही असते. वयोमानाने किंवा काही इतर कारणानी अवयव तक्रार करायला लागतात. जसजसे वय वाढते तसतसे हाडांची झीज होते आणि गुडघेदुखीची समस्या (Knee pain problems) उद्भवते.आपल्या संपूर्ण शरीराचा भार वाहणारे पाय दुखू लागतात. पायाचा महत्वाचा सांधा म्हणजे ‘गुडघा’. आजकाल बरेच लोक या गुडघेदुखीने त्रस्त असतात. त्याची कारणे वेगवेगळी असतात. पण जेव्हा दुखणे असह्य होते, सर्व उपाय संपतात तेव्हा ‘शस्त्रक्रिया’ हा शब्द कानावर पडतो. उगीच भीती वाटते. शंका मनात येतात. गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया (Knee Replacement Surgery) म्हणजे काय ते समजून घेऊयात.

गुडघेदुखीची सुरुवात सौम्य वेदनेने सुरु होते. कालांतराने वेदना तीव्र होत जातात. चालायला, चढ उतर करायला किंवा मांडी घालून बसायला, उठायला त्रास होऊ लागतो. पेन किलर(Painkillers)  व इतर औषधोपचाराचा परिणाम होईनासा होतो तेव्हा डॉक्टर  शस्त्रक्रियेचा सल्ला देतात. शस्रक्रियेची गरज आहे की नाही हे गुडघ्याच्या एक्सरे (x-ray) वरून समजते. एक्सरेमध्ये  हाडांची झालेली झीज , एकमेकांवर होणारे घर्षण याची माहिती कळते. हाडांची झीज जर जास्त प्रमाणात असेल तर अशा वेळी गुडघा बदलण्याची गरज पडते. 

प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमध्ये(Transplant Surgery) खराब झालेले सांधे बदलले (Joint Replaced) जातात. त्याजागी धातू, प्लास्टिक किंवा सिरामिकचे सांधे बसवले जातात. गुडघा प्रत्यारोपणाच्या सध्या प्रचलित अशा तीन पद्धती आहेत.

  1. टोटल नी रिप्लेसमेंट(Total Knee Replacement) : यात संपूर्ण गुडघा म्हणजे घुडघ्याची वाटी बदलली जाते. गुडघ्याच्या शिरा खराब असतील , हाडांची जास्त झीज झाली असेल , हाडांना इजा झाली असेल तर अशी शस्त्रक्रिया करावी लागते.
  2. अंशत: नी रिप्लेसमेंट(Partial Knee replacement): गुडघ्याचा काही भाग यात बदलला जातो. हाडांच्या कमजोरीमुळे अशा प्रकारची शस्त्रक्रिया लागते लागते. 
  3. कॉम्प्लेक्स नी रिप्लेसमेंट(Complex Knee Relacement): गुडघ्याची आधी एखादी शास्त्रक्रिया झालेली असेल किंवा संधीवातामुळे खूप त्रास होत असेल तर ही शस्त्रक्रिया करावी लागते. 

या सर्व शस्त्रक्रियांनंतर रुग्णाला योग्य उपचार पद्धतीने चालण्यास मदत केली जाते. 

पूर्वीपेक्षा गुडघ्याच्या प्रत्यारोपणाच्या शास्त्रक्रियेत(Knee Transplantation Surgery)  खूप सुधारणा झालेली आहे. गुडघ्याची वाटी, सांधे बदलून नीट बसवले तरच शस्त्रक्रिया यशस्वी होते. रोबोटिक तंत्रज्ञानाचा(Robotic technology)वापर करून आधीच आतील रचना कशी असेल हे कॉम्पुटरवर पाहता येते. चुका टाळता येतात. शास्त्रक्रिया 100% यशस्वी होण्याचे प्रमाण पण या तंत्रज्ञानामुळे वाढले आहे. शस्त्रक्रियेनंतर 12 ते 24 तास मदतीने चालण्याचा प्रयत्न करू शकतात. रूग्णांना बर्‍यापैकी बरे होण्यासाठी 4 ते 12 आठवडे कालावधी लागतो. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना सहसा पहिल्या काही दिवस थकल्यासारखे वाटते. गुडघा दुखणे आणि अस्वस्थता जाणवते, विशेषत: जेव्हा ते हलवत असताना किंवा चालण्याचा प्रयत्न करतात. परंतु योग्य औषधे दिल्याने तोही त्रास जाणवत नाही.इनामदार हॉस्पीटल मध्ये ही शस्त्रक्रिया तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. आजवर अनेक रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे.

आमच्या तज्ञांकडून गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया (Knee Replacement Surgery) या विषयाबद्दल सर्व जाणून घ्या आजच इनामदार हॉस्पिटलमध्ये (Inamdar Hospital) आम्हाला भेट द्या!

पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल   (Inamdar Multispeciality Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते.पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

You may use these <abbr title="HyperText Markup Language">HTML</abbr> tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

*