सध्या मुंबई आणि इतर शहरांमध्ये गोवरची साथ जोरात चालू आहे. या साथीमुळे काही लहान मुलांना जीवही गमवावा लागला. कोरोना साथीच्या काळात गोवर (Grover) लसीकरण काहीसे मागे पडल्यामुळे या साथीचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळत आहे. अद्यापही ही साथ आटोक्यात आलेली नाही हे आपण पाहत आहोत. लहान मुलांना सर्वप्रथम गोवर (Grover) आजाराचा संसर्ग होत असल्याने आपण खूप काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी, आपल्याला या आजाराबद्दल प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे. तर, या लेखात आपण जाणून घेणार आहोत गोवरविषयी माहिती!

गोवर हा विषाणूमुळे पसरणारा आजार आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या खोकण्यामुळे किंवा शिंकण्यामुळे हा आजार पसरतो. रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या सरसकट प्रत्येक व्यक्तीला संसर्ग होत नाही परंतु जर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता वाढते. प्राण्यांना गोवर (Grover) होत नाही किंवा प्राण्यांमुळे गोवर पसरत नाही.

गोवर ची लक्षणे (Symptoms of Grover)

गोवर म्हणजे फक्त लाल पुरळ नाही. बाळांना आणि लहान मुलांना झालेला संसर्ग हा धोकादायक असू शकतो.

  • खूप ताप येणे (१०४ अंशाच्या वरही ताप जाऊ शकतो)
  • खोकला, वाहणारे नाक,खोकला
  • डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे
  • घसा खवखवणे
  • अशक्तपणा वाटणे
  • स्नायू वेदना होणे
  • डोळे लाल होऊन जळजळणे
  • लाल बारीक पाठ ,हात आणि पोटावर पुरळ

लक्षणे दिसण्याच्या ४ दिवस आधी आणि लक्षणे दिसू लागल्यावर ४ दिवस नंतर रुग्णाकडून इतरांना संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त असते. लहान मुले आणि गरोदर महिलांनी साथीच्या काळात जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

गोवरची कारणे (Causes of Grover) –

थंडीच्या दिवसात गोवरची साथ येते. प्यारायूक्झियम नावाचा व्हायरस विषाणू अति संसर्गजन्य प्रकारातील हा विषाणू आहे. ज्यास गोवर झाला आहे. त्यास खोकला, शिंका यातून विषाणू पसरतो.85% गोवर याप्रकारे पसरतो.
शरीरात paramyxovirus या विषाणूची लागण झाल्यानंतर साधारण 10 ते 12 दिवसांनी गोवरची लक्षणे दिसून येतात. लसीकरण कार्यक्रमानुसार बाळांना गोवर, रुबेला आणि गालगुंड अशा तीन आजारांसाठी (MMR vaccine) एकत्रित लस दिली जाते. पहिला डोस हा बाळ १२-१५ महिन्याचे असताना दिला जातो आणि दुसरा डोस हा ४-६ वर्षाचे झाल्यावर दिला जातो.

गोवरचे उपचार (Treatment of Grover)

गोवरची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. हा आजार टाळण्याचा प्रभावीपणे म्हणजे गोवरची लस घेणे. गोवराची लस गोवराच्या विषाणूपासून बनवलेली आहे. गोवराच्या विषाणूवरील सर्व प्रथिने शिल्लक असल्याने शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते.

रुग्णांना डॉक्टरांच्या सल्याने गोळ्या औषधे देणे.या उपचाराला घरगुती उपाय न करणे. हे व्हायरस इन्फेक्शन असल्याने रुग्णांमध्ये अशक्तपणा जाणवतो. त्यासाठी दिवसातून 7 ते 8 ग्लास पाणी प्या. नेहमी ताजे व सकस अन्न घेणे. त्याचबरोबर फळे, ज्यूस, दूध घेणे. पुरेशी विश्रांती घेणे. डॉक्टरांना त्वरित भेट देणे महत्वाचे आहे.

पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल(INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते.

पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करत

Leave a Reply

Your email address will not be published.

You may use these <abbr title="HyperText Markup Language">HTML</abbr> tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

*