हायमेनोप्लास्टी | Hymenoplasty Treatment in Pune | Inamdar Hospital

भारतामध्ये समाजाचे अनेक नियम पुरुषांना लागू होत नाहीत. म्हणजे लग्नाच्या आधी  पुरुषांच्या व्हर्जिनिटीला कोणी विचारत नाही, पण मुली व्हर्जिन आहेत की नाही, याला खूप महत्त्व आहे. हायमेनोप्लास्टी (Hymenoplasty) ही स्त्रियांशी निगडीत शस्त्रक्रिया आहे. योनीमार्गाच्या वरील थर म्हणजे हायमेन असतो.स्त्रियांना केवळ शारीरिक संबंधांमुळेच नव्हे तर खेळ, पोहणे किंवा सायकलिंगमध्ये भाग घेतल्याने मुलीचे हायमन तुटते ही वेगळी गोष्ट आहे. पण या वस्तुस्थितीबाबत लोक अजूनही अज्ञानी  आहेत ही खेदाची बाब आहे. या कारणांमुळे स्त्रीवर तिचे हायमेन सुरक्षित ठेवण्याचा दबाव असतो.

हायमेनची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतात जेव्हा त्यांना वाटते की त्यांचे हायमेन फाटले आहे आणि त्यांच्या योनीमध्ये काहीतरी अडचण  आहे. या स्थितीमुळे अविवाहित आणि विवाहित महिलांना लैंगिक संबंध ठेवण्यात अडचणी येऊ शकतात. विवाहानंतर अविवाहित आणि विवाहित असले तरी पतीसोबत लैंगिक संबंधात इच्छित आनंद मिळण्यात अडचण येऊ शकते. याशिवाय भारतात समाजातील पुरुषी मानसिकताही अशीच आहे की, लग्नाआधी मुलीचा हायमन तुटला तर तिच्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण होतो.याशिवाय, बलात्कार झाल्यास किंवा विवाहपुर्वी लैंगिक संबंध झाल्यास अनेकजणी हायमेन शस्त्रक्रियेचा निर्णय घेऊ शकतात.

हायमेनोप्लास्टी शस्त्रक्रिया म्हणजे काय? (What is hymenoplasty surgery?)

हायमेन शस्त्रक्रिया ज्याला हायमेनोप्लास्टी (Hymenoplasty) म्हणतात त्यात हायमेनची पुनर्रचना केली जाते. या शस्त्रक्रियेद्वारे योनीमार्गाच्या वरील थर, ज्याला हायमेन म्हणतात, जो कोणत्याही कारणाने तुटलेला असतो, त्याच्या मूळ स्थितीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. यासोबत योनीमार्गातील ढिलेपणा दूर करून योनीमार्ग घट्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. तर, हायमेनोप्लास्टी, ज्या समाजात स्त्रीचे कौमार्य हे आदराचे चिन्ह आहे अशा समाजात प्रचलित आहे, ही एक विवादास्पद शस्त्रक्रिया आहे जी अनेक नैतिक समस्या निर्माण करते.

शस्त्रक्रियेची पद्धत काय आहे? (What is the surgical procedure?)

हायमेन शस्त्रक्रिया करण्यापूर्वी, डॉक्टर हायमेनला किती नुकसान झाले आहे याची तपासणी  करतात. यामध्ये जर त्यांना हायमेनचा कोणताही भाग सुरक्षित आणि सुरळीत आहे असे वाटत असेल तर ते शिलाई करून ते ठीक करतात. एक सोपी प्रक्रिया आहे, ज्यासाठी स्त्रीला स्थानिक भूल देऊन काम केले जाते. हायमेन शिवण्यासाठी वापरलेले धागे काही काळानंतर स्वतःच विरघळतात. यामुळे शिलाईच्या खुणाही राहत नाहीत.

हायमेन शस्त्रक्रियेच्या या सोप्या प्रक्रियेस 30-40 मिनिटे लागतात. या शस्त्रक्रियेनंतर काही तासांनी महिलेला डॉक्टरांनी घरी जाण्याची परवानगी दिली.

हायमेनोप्लास्टी  (Hymenoplasty) ही तज्ञ डॉक्टरांच्या मार्ग्दर्शानाखालीच करणे गरजेचे आहे. अनेकवेळा हि शस्त्रक्रिया चुकीच्या ठिकाणी केल्याने अनेक स्त्रियांना त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागले आहेत. इनामदार हॉस्पिटलमध्ये तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांचा  सल्ला जरूर घ्या.

पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल   (Inamdar Multispeciality Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते.पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may use these <abbr title="HyperText Markup Language">HTML</abbr> tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

*