Inamdar Hospital

PCOD वर नियंत्रण मिळविण्यासाठी हा आहार आवश्यक(Controlled Diet)

PCOD  हा आजार जीवनशैलीतील बदल, चुकीच्या पद्धतीचा आहार, ताणतणाव ह्यामुळे हार्मोन्स(Hormones)  मधे असंतूलन निर्माण झाल्याने प्रामुख्याने महिलांमध्ये होतो. याची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

PCOD  लक्षणे (Symptoms of PCOD) –

अनियमित पाळी(Irregular periods),लढ्ढपणा, चेहर्यावर मुरूम (Acne) येणे,केस गळणे,दाढी मिशांचा जागी केस येणे, गर्भधारणा(Pregnancy) राहण्यास अडथळा, इत्यादी. या सर्व लक्षणावर मात करण्यासाठी आहारात बदल करणे अत्यंत आवश्यक आहे . त्यासाठी महिलांनी नियमित काय खावे, काय खाऊ नये,  ह्याची आपण माहिती घेणार आहोत. आहारत योग्य तो बदल केल्यास हा आजार पूर्णपणे नियंत्रणात येवू शकतो. सर्वांत प्रथम *”Healthy eating habits develope”*  करणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील उपाय….

 • प्रथिनयुक्त पदार्थ खाणे  उदा. कडधान्ये,मासे,चिकन , टोफू, फायबर युक्त फळे.
 • Unsaturated fat युक्त पदार्थ खाणे.उदा. अक्रोड, खोबरेल तेल,ऑलीव्ह ऑईल, सुर्यफुलाचे तेल किंवा बिया,जवस, चियासिड(Chiacid)  यांचा समावेश होतो.
 • अत्यंत महत्त्वाचे म्हणजे रोजच्या वापरात प्लास्टिक चार वापर पूर्णपणे बंद करावा. या सवयीमुळे  पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी  आपली थोडीफार मदत होईल. उदा.प्लास्टिकच्या बाटलीतून रोज पाणी पीणे बंद करावे.जेवणासाठी प्लास्टिकच्या डब्ब्याचा वापर, प्लास्टिक फूड पार्सल इत्यादी चा वापर शक्यतो टाळावा.
 • नियमित व्यायाम करणे. चालणे,धावणे, सुर्यनमस्कार घालणे इ.
 • दररोज ८ तासाची झोप 4.घेणे गरजेचे आहे.
 • सकाळी कोमट पाणी(Warm Water)  पिणे.सकाळा चा नाश्ता वेळेत घेणे.आवळा,एलोवेरा चे ज्यूस, मोड आलेले कडधान्य सकाळी खावे.फळांच्या ज्यूस ऐवजी अख्खे फळ खाण्यावर भर द्यावा ते फायदेशीर आहेत.
 • वजन नियंत्रणात ठेवणे.

कोणते पदार्थ खाणे टाळावे (Foods to Avoid)

साधारणपणे रक्तातील साखरेची पातळी वाढेल असे पदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहे.

 1. रिफाईन्ड कार्बोहाइड्रेट(Refined Carbohydrates)– PCOD मध्ये इन्सुलिन चे प्रमाण वाढलेले असते त्यामुळे कार्बोहाइड्रेट चे शोषण निट होत नाही, त्यासाठी रिफाईन्ड कार्बोहाइड्रेट युक्त पदार्थ खाणे टाळावे. यामध्ये मैद्या पासून बनवलेले पदार्थ, व्हाईट ब्रेड, व्हाईट राईस, पास्ता, बेकरीचे सर्व पदार्थ खाणे टाळावे.
 2. साखरयुक्त पदार्थ जसे की चहा,काॅफी,केक,चाॅकलेट, जाम,चे आहारातील प्रमाण कमी करणे.
 3. प्रकिया केलेले पदार्थ. चीज, पनीर,साखरयुक्त दही हे पदार्थ टाळावे. त्याऐवजी घरी बनविलेले दही, ताक,पनीर  तुम्ही खाऊ शकता.
 4. अल्कोहोलीक ड्रिंक्स करणे टाळावे.

PCOD चे लक्षणे नियंत्रणांत आणण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे, त्याच बरोबरीने प्रदीर्घ काळासाठी आहारात  वरील  पद्धतीने दररोज सेवन केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो व PCOD  नियंत्रणात येतो.

पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल   (Inamdar Multispeciality Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते.

पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *