Inamdar Hospital

प्रसूतीनंतर आईचा आहार कसा असावा(What should be the Postpartum Diet)?

आई होणे ही अत्यंत आनंददायक गोष्ट आहे. जगात प्रत्येक स्त्रीला आई व्हावेसे वाटते। मग ती गरीब किंवा श्रीमंत जगातली कोणतीही स्त्री असो, दोघींच्याही आईपणाच्या भावना सारख्याच असतात. मात्र प्रसूतीनंतर म्हणजे बाळ झाल्यानंतर आईची जबाबदारी जास्त वाढते. कारण बाळ मोठे होईपर्यंत, वरचे दूध किंवा इतर अन्नघटक त्याच्या पोटात जाईपर्यंत त्याचे भरण पोषण आईच्या स्तनपानावरच चालते. त्यामुळेच आईला स्वतःचे आरोग्य त्याचप्रमाणे बाळाचे आरोग्य चांगले रहावे मजबूत राहावे यासाठी योग्य आहार करणे अत्यंत गरजेचे आहे.

प्रसूती काळात आईची शारीरिक झीज प्रचंड प्रमाणात झालेली असते. ही झीज भरून येणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. अनेकदा बाळाला स्तनपान केल्यानंतर स्त्रीला  थकून गेल्यासारखे वाटणे, गळा ठरल्यासारखे वाटणे, डोळ्यासमोर अंधारी येणे चक्कर येणे यासारख्या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. याचा अर्थ तुमच्या शरीराची स्थिती अॅनीमिक आहे हे ओळखावे. याचसाठी महिलांना सकस आणि आरोग्यवर्धक आहाराची अत्यंत आवश्यकता असते. आजकालच्या काळात जंक फूड, फ्रोजन फुड, बाहेरचे चमचमीत खाणे याकडे स्त्रियांचा कल जास्त असतो. परंतु या कोणत्याही गोष्टींमधून पोषण आहार तर मिळणार नाहीच, पण या गोष्टी तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या प्रकृतीला हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे काही महिने तरी संयम बाळगा आणि डॉक्टरांनी सुचवलेला योग्य आहार घ्या. 

प्रसूतीनंतर आईचा आहार कसा असावा?

प्रसुतीनंतर  सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लोह. प्रसूतीपूर्वी आणि प्रसूती नंतरही आहारासोबत तिने शरीरातील लोह वाढवणाऱ्या गोळ्या घेतल्या पाहिजेत. त्याचा फायदा तिला आणि तिच्या बाळाला होईल. बाळंतपणानंतर दोन ते तीन महिने या गोळ्या चालू ठेवाव्यात. या गोळ्या मनाने न घेता डॉक्टरांनी सुचवल्या प्रमाणे घ्याव्या. आहारातही  हिरव्या पालेभाज्या, डाळी, नाचणीमासे मटन खावे.

प्रसूती झाल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या कॅल्शियम गोळ्याही खाव्यात. तसेच दुध आणि दुग्ध जन्य पदार्थ खावे.

काही स्त्रियांमध्ये ओटीपोटात अधिक दुखते. पाठ-कंबर दुखण्याच्या तक्रारी वाढतात. त्यामुळे चहा-कॉफी किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन कमी करावे. सकस आहार घेणे खूप गरजेचे असते.

  • फळांचे नियमित सेवन करावे, फळात विशिष्ट खनिज, जीवनसत्त्व, आणि फायबर असते. सर्व रंगांची फळे खावीत.
  • सुकामेवा खाल्ल्याने पण खूप फायदा होतो. परंतु तो योग्य प्रमाणात खावा. बदाम भिजवून खावेत. काळे मनुके भिजवून खाल्ल्याने पोट साफ राहण्यास मदत होते. 
  • जिरे आणि ओवा पचनक्रिया स्वस्थ राहण्यास मदत करतात. तसेच जेवल्यावर बडीशेप सुद्धा खावी.
  • मेथीचे दाने, तीळ, डिंकाचे लाडू हे शक्ती वाढवण्यास मदत करतात. शरीरातली झीज भरून काढण्यासाठी मदत होते, पण त्याचे प्रमाण योग्य असावे. 

प्रसुतीनंतर बाळाच्या प्रत्येक अनेक गोष्टीकडे स्त्रियांचे लक्ष असते. पण बाळाबरोबर स्वत:ची काळजी घेणे पण महत्वाचे असते. सहा महिन्यांनी डॉक्टरांकडे जाऊन भेट देणे जास्त योग्य ठरते. 

Inamdar Multispeciality Hospital

पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispecialty Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *