सर्वसामान्यपणे पेशींची अनियंत्रित वाढ झाली की कर्करोग (Cancer ) झाला असण्याची शक्यता असते.पेशींच्या ह्या अवास्तव वाढीतूनच शरीराच्या ठराविक भागात गाठ तयार होते.मग ही वाढ कुठंही असु शकते. स्वादुपिंड(Pancreas), स्तन, तोंड, मोठे आतडे ,त्वचा. हाडांचा, रक्ताचा कर्करोग सुद्धा होऊ शकतो.ह्या प्राणघातक आजारावर अजूनही पूर्णपणे बरा होईल असे औषध नाही. परंतु लवकर निदान झाले तर तो थोपविता येऊ शकतो.आणि रुग्ण बरा होऊ शकतो.
अजूनही त्यावर शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत.
कर्करोग चा प्रथम आपण ह्या आजाराची ढोबळ लक्षणे बघुया(Symptoms of Cancer)
- अचानक वजन कमी होणे.
- लघवीतून रक्त जाणे
- लवकर बऱ्या न होणाऱ्या जखमा
- दीर्घ काळ खोकला असणे
- वारंवार घसा दुखणे
- स्तनात किंवा कुठेही अचानक पणे गाठ उद्भवणे
- अन्न गिळताना त्रास होणे
- वारंवार होणारी पोटदुखी, डोकेदुखी सुद्धा कर्करोगाचे लक्षण असू शकते.
आज आपण बघतो विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की संपूर्ण जग जवळ आले आहे. संगणक आणि जैविक क्षेत्रातील प्रगतीने मानवाचे जीवनच बदलून गेले आहे. ही उत्क्रांती जशी मनुष्याला लाभकारक ठरली तशीच काही हानिकारकही ठरत आहे.
खूप संशोधनाअंती असे दिसून आले आहे की धूम्रपान आणि मद्यपान कर्करोगाचे जरी प्रमुख कारण असले तरी आजकालची बदलती जीवन शैली ही तितकीच कारणीभूत आहे.
सततच्या घड्याळाच्या काट्यावर चालण्यामुळे येणार ताण तणाव वातावरणातील वाढणारे प्रदूषण, व्यायामाचा अभाव आणि सकस अन्नाची कमतरता ह्यामुळे देखील ह्या आजाराला निमंत्रण मिळते. हल्ली पार्टी कल्चर असल्यामुळे तरुणांमध्ये वेळी अवेळी जागरण, जंक फूडची आवड , बटर चीजचा अतिरिक्त वापर, यामुळे तर तरुण पिढीत हा आजार झपाट्याने पसरत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे.
सतत एका जागेवर बसणे लॅपटॉप वर तासनतास काम करणे ह्यामुळे देखील कलोन व स्तनांचा कर्क रोग होऊ शकतो. कधी कधी थोडे दुखले की दुर्लक्ष केले जाते यातूनच कर्करोग दुर्लक्षिला जातो आणि तो कधी लास्ट स्टेजला जातो हे देखील समजत नाही. हल्ली स्वयंपाक घरात वारंवार otg किंवा microwave चा वापर करतात. त्यातील निर्माण होणाऱ्या रेडिएशन(Radiation) मूळे देखील कर्क रोगाची शक्यता वाढते.
म्हणूनच जर ह्या आजारापासून बचाव करायचा असेल तर स्वतःसाठी वेळ काढा. एखादा छंद आवड जोपासा त्यामुळे आपोआप ताण दूर होण्यास मदत होईल. व्यायाम योग करा. ताज्या भाज्या, अंकुरित कडधान्य आणि भरपूर फळांचा आहारात समावेश करा. चौरस आहार आणि योग्य आचार विचार हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे!
पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispeciality Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते.
पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.