किडनी ही आकाराने लहान असली तरी सुद्धा किडनी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे. शरीरामधील अनावश्यक घटक काढून टाकणे, रक्त फिल्टर करण्याचे कार्य तसेच रक्तदाब नियंत्रित करणे यांसारखे विविध कार्य किडनी करते. यासोबतच सोडियम तसेच पोटॅशियम सारख्या द्रव आणि इलेक्ट्रोलाईटचे संतुलन राखण्याचे कार्य सुद्धा किडनी करते. ज्यावेळी किडनीचे कार्य विस्कळीत होते त्यावेळी शरीरामध्ये अनावश्यक घटक तयार होऊ लागतात आणि यामुळे थकवा तसेच उच्च रक्तदाब आणि इतर समस्या निर्माण होतात. म्हणून किडनीचे आरोग्य व्यवस्थित राहणे हे खूप महत्त्वाचे आहे.
किडनीच्या आजारावरील आहार अशाप्रकारे असावा :
१. प्रोटीनचे सेवन योग्य प्रमाणामध्ये करणे
आपल्या शरीरासाठी प्रोटीन आवश्यक असले तरीसुद्धा किडनीच्या आजारामध्ये प्रोटीनचे अधिक सेवन किडनीवर अतिरिक्त ताण आणू शकतात. प्रोटीनचे अपघटन किडनीच्या कार्यावर दबाव आणू शकतात म्हणून प्रोटीनचे योग्य प्रमाण घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच रेड मीट, चिकन तसेच दुग्ध पदार्थांची मात्रा आपल्या आहारामधून नक्कीच कमी करावे, या ऐवजी योग्य प्रमाणामध्ये मूग तसेच मसूर यासारख्या शाकाहारी पदार्थांचे सेवन उपयुक्त ठरू शकते.
२. पोटॅशियमचे प्रमाण नियंत्रित करणे
किडनीला काही नुकसान झाल्यास पोटॅशियमचे प्रमाण वाढू शकते आणि जास्त पोटॅशियम हृदयाच्या कार्यावर परिणाम करू शकतात म्हणून किडनीच्या आजारामध्ये पोटॅशियम युक्त पदार्थाची मात्रा नियंत्रित करणे खूप गरजेचे आहे. किडनीच्या आजारामध्ये कमी पोटॅशियम असलेले पदार्थ जसे की सफरचंद, गाजर, स्ट्रॉबेरी, बेरी, द्राक्षे, कोबी यांसारख्या पदार्थांचा समावेश आहारामध्ये करू शकतात.
३. सोडियमच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे
सोडियम मुळे किडनीवर जास्त ताण येऊ शकतो तसेच सोडियमच्या अधिक सेवनामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते आणि यामुळे किडनीवर अधिक दबाव येऊ शकतो. म्हणून रोजच्या आहारामध्ये कमी प्रमाणामध्ये मिठाचे सेवन करावे. सोडियम कमी असलेले पदार्थ जसे की ताजे फळे, भाज्या, घरगुती अन्नपदार्थ यांचे सेवन करू शकतात परंतु जास्त गोड पदार्थ तसेच प्रोसेसड फूड खाणे टाळावे.
४. फॉस्फोरसचे सेवन कमी करा
किडनीच्या आजारामध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त होऊ शकते. फॉस्फरस असलेले पदार्थ किडनीला फिल्टर करण्यामध्ये मदत करत नाहीत आणि यामुळे हाडे कमजोर होऊ शकतात म्हणून आपल्या आहारामध्ये जास्त फॉस्फरस असलेले पदार्थ खाणे टाळावे. सफरचंद, खजूर, काकडी, टोमॅटो,कोबी यांसारखे फॉस्फरस कमी असलेले पदार्थ आपल्या आहारामध्ये समावेश करू शकता.
५. साखर खाणे कमी करावे
किडनीच्या आजारामध्ये साखरेचे सेवन करण्यावर सुद्धा अधिक लक्ष दिले पाहिजे. जास्त साखर खाल्ल्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स तसेच इतर समस्या निर्माण होऊ शकतात आणि यामुळे किडनीला अधिक तान येऊ शकतो. ज्या व्यक्तींना गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय होत नाही ते शुगर फ्री मिठाई खाऊ शकता तसेच फळांचा सुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकता.
६. पाणी योग्य प्रमाणामध्ये प्या
आपल्याला माहीतच आहे की आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्त्वाचे आहे परंतु किडनीच्या आजारामध्ये शरीरामध्ये पाणी साठण्याची शक्यता असते म्हणून पाणी पिण्याचे प्रमाण हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवू शकता. अधिक पाणी पिल्यामुळे किडनीवर जास्त दबाव पडू शकतो तसेच कमी पाणी पिल्यामुळे शरीरामध्ये विषारी पदार्थ जमा होऊ शकतात म्हणून पाणी पिण्याचे योग्य प्रमाण हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ठरवा.
७. तेलकट पदार्थ तसेच जास्त फॅट्स असलेले खाद्यपदार्थ खाणे टाळावे
किडनीच्या आजारामध्ये तळलेले तसेच जास्त फॅट्स असलेले खाद्यपदार्थ खाणे टाळा. हे पदार्थ हृदयाच्या समस्या वाढवू शकतात तसेच किडनीला अधिक ताण देऊ शकतात म्हणून तेलकट पदार्थ तसेच जास्त फॅट्स असलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत.
८. फायबरचे सेवन जास्त प्रमाणामध्ये करा
किडनीच्या आजारामध्ये फायबरचे सेवन वाढवण्याचा सल्ला दिला जातो कारण फायबर्समुळे शरीराच्या पचन प्रक्रियेला मदत होते आणि अतिरिक्त वजन कमी करण्यामध्ये सुद्धा मदत होते. होल ग्रेन्स, फळे, भाज्या तसेच डाळी यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करू शकता.
९. वजन नियंत्रणामध्ये ठेवावे
किडनीच्या आजाराचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी वजन नियंत्रणामध्ये ठेवणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. जर शरीराचे अतिरिक्त वजन असेल तर किडनीवर ताण येऊ शकतो परंतु शरीराचे वजन नियंत्रणात आणले तर किडनी वरील ताण कमी होऊ शकतो यासाठी योग्य आहार आणि व्यायाम हे दोन्हीही अत्यंत आवश्यक आहे.
१०. आहारामध्ये विविधता
किडनीच्या आजारामध्ये विविध प्रकारच्या आहाराचा समावेश करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. आपण घेत असलेल्या आहारामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व जीवनसत्वे, खनिजे आणि पोषण आहे की नाही याची खात्री करावी आणि योग्य आहाराचे सेवन करावे. आपल्या आहारात नक्कीच फळे ,भाज्या यांचा समावेश असावा.
किडनीच्या उत्तम आरोग्यासाठी टाळावे लागणारे काही पदार्थ
किडनीचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी पुढील खाद्यपदार्थ खाणे टाळावे खाणे टाळावे.
- फास्ट फूड तसेच चिप्स यासारखे खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
- केळी, बटाटे तसेच संत्री यांसारख्या जास्त पोटॅशियम असणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन कमी प्रमाणामध्ये करणे.
- तसेच काही बीयामध्ये आणि शेंगदाण्यांमध्ये फॉस्फरसचे प्रमाण हे जास्त असते म्हणून त्यावर सुद्धा नियंत्रण ठेवावे.
- प्रक्रिया केलेले मांस खाणे टाळावे.
- तसेच तळलेले आणि जास्त फॅट्स असलेले खाद्यपदार्थ खाणे टाळा.
नक्कीच किडनीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक रुग्णाची किडनीच्या आजाराची परिस्थिती ही वेगवेगळी असू शकते म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य आहार तसेच व्यायाम आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी अशा काही गोष्टींमुळे नक्कीच किडनीच्या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.