नवजात बाळाची प्रतिकारशक्ती(Immunity) वाढवण्यासाठी आणि अनेक रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी लसीकरण(Immunization) करणे आवश्यक असते.लसीकरण म्हणजे लसीमध्ये विशिष्ट आजाराचे जिवाणू किंवा विषाणू असतात( मृतावस्थेत किंवा जिवंत पण अर्धमेले केलेले).अशी लस टोचल्यावर त्या आजारविरुद्ध लढण्याची शरीरात प्रतिकारशक्ती(Immunity)निर्माण होते.लहान मुलांसाठी घातक असलेले सहा रोग घटसर्प, डांग्या खोकला(whooping cough), धनुर्वात(Sagittarius), क्षयरोग(Tuberculosis), गोवर आणि पोलिओ रोगप्रतिबंधक(Polio vaccine)लस दिल्याने टाळता येतात.नवजात बाळाचे लसीकरण तक्ता हा बालरोगतज्ज्ञ त्या बाळाच्या पालकांना देतातच.या लसींवरील माहिती आपण थोडक्यात घेऊया.
बाळ जन्मल्यावर लगेच पोलिओ(Polio), बीसीजी(BCG) आणि हेपाटिटिस-B (Hepatitis- B) अशा तीन लसी दिल्या जातात.
बाळाच्या तोंडात दोन थेंब पोलिओचा डोस दिला जातो. बीसीजी लस(BCG Vaccine) क्षयरोगापासून(tuberculosis) रक्षण करणारी ही लस डाव्या दंडावर देतात. हेपाटिटिस बी ची पहिली लस बाळाच्या डाव्या मांडीत बाहेरील बाजूस दिली जाते.
बाळाला दीड महिना किंवा सहा आठवडे पूर्ण झाल्यावर पोलिओचा पहिला डोस दिला जातो. यामध्ये बाळाच्या तोंडात दोन थेंब पोलिओचा डोस दिला जातो. बाळाला सहा आठवडे पूर्ण झाल्यावर डी.पी.टी. चा पहिला डोस दिला जातो. यामध्ये बाळाच्या उजव्या मांडीच्या बाहेरील बाजूस लस टोचली जाते. हेपाटिटिस बीची दुसरी लस दिली जाते
बाळाला अडीच महिना किंवा दहा आठवडे पूर्ण पोलिओ , डी.पी.टी(DPT). – बाळाला अडीच महिना पूर्ण झाल्यावर डी.पी.टी. चा दुसरा डोस दिला जातो. हेपाटिटिस बी ची तिसरी लस बाळाच्या डाव्या मांडीत बाहेरील बाजूस दिली जाते.
बाळाला साडेतीन महिने किंवा 14 आठवडे पूर्ण झाल्यावर दोन लसी दिल्या जातात.पोलिओ – बाळाला साडेतीन महिने पूर्ण झाल्यावर पोलिओचा तिसरा डोस दिला जातो. यामध्ये बाळाच्या तोंडात दोन थेंब पोलिओचा डोस दिला जातो. डी.पी.टी. चा तिसरा डोस दिला जातो. यामध्ये बाळाच्या उजव्या मांडीच्या बाहेरील बाजूस लस टोचली जाते.
नऊ महिने पूर्ण झाल्यावर बाळाला दोन लसी दिल्या जातात. गोवर(Measles)– जन्मल्यानंतर नऊ महिने पूर्ण झाल्यावर ही लस बाळाच्या उजव्या दंडाच्या वरच्या बाजुला टोचली जाते.नऊ महिने पूर्ण झाल्यावर व्हिटॅमिन A (Vitamin-A) चा पहिला डोस बाळाला तोंडावाटे दिला जातो.
काही कारणांमुळे बाळाला तीन वर्षांपर्यंत कुठलीच लस दिलेली नसेल तर प्रत्येक महिन्यात एक अशी द्विगुणि लशीची तीन इंजेक्शन आणि पोलिओ डोस द्यावे. एक वर्षाने दोन्हीचे बूस्टर व पाचव्या वर्षी दुसरा बूस्टर डोस घ्यावा.
लहान मुले हेच आपले भविष्य आणि संपत्ती असल्या कारणाने त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि पर्यायाने निरोगी समाजासाठी त्यांचे वेळोवेळी लसीकरण करणे आपले कर्तव्य आहे आणि ते आपण पूर्ण केले पाहिजे.नवजात बाळाचे लसीकरण करण्यासाठी आजच भेट द्या इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल.
पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.