IVF Treatment in Pune | Inamdar Multispecialty Hospital

एका स्त्रीचं बाईपण पूर्ण होते तर तिच्या मुलाच्या जन्माने. आई होणे एका गोंडस बाळाला जन्म देणे हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतो पण जर एक स्त्री आई होऊ शकली नाही तर तो दुःख काय असतो हे तिलाच माहीत असते. पहिले तंत्रज्ञान विकसित नसल्यामुळे स्त्रियांना बाळ दत्तक घेणे होतं पण आता आयवीएफ हा गर्भ न धारण करू शकणाऱ्या स्त्रीसाठी वरदान आहे. या तंत्रज्ञानामुळे अनेकांचं पालक बनण्याचं स्वप्न पुर्ण झालं आहे. हे तंत्रज्ञान काय आहे? हा कश्याप्रकारे काम करतो? काय खरचं एक स्त्री या प्रक्रियेने आई बनू शकते? असे अनेक प्रश्न हे ऐकताच निर्माण झाले असणार पण या लेखात आपण त्यांच उत्तर देणार आहोत.

IVF म्हणजे काय?

आयवीएफचं पूर्ण नाव इन विट्रो फर्टिलायझेशन आहे. हे एक एडवान्सड फर्टिलिटी तंत्रज्ञान आहे ज्यात स्त्रीची अंडी आणि पुरुषाचे स्पर्म लॅब मध्ये तंज्ञाच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित केले जातात आणि स्वस्थ गर्भ तयार करण्यात येतो. हा स्वस्थ गर्भ नंतर स्त्रीच्या गर्भाशयात ट्रान्सफर केला जातो, ज्यानंतर गर्भधारणा आणि बाळाचा जन्म अगदी नैसर्गिकरित्या होतो.

IVF प्रक्रिया:-

IVF प्रक्रिया सुरू करण्याआधी सर्व प्रथम तुम्हाला डॉक्टरांशी संपर्क साधावा लागतो. एक्सपर्ट फर्टिलिटी डॉक्टर तुमच्या स्थितीचं परीक्षण करून तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन देऊन तुम्हाला मानसिकरित्या तयार करतात व तुमची ट्रीटमेंट सुरू केल्या जाते. या मध्ये इंजेक्शनने फॉलिकल्स विकसित केले जाते जेणेकरून जास्त स्त्रीबीज प्राप्त होतील. कारण जितकी जास्त चांगल्या गुणवत्तेची स्त्रीबीज मिळवता येतील तितके चांगले भ्रूण किंवा गर्भाशय तयार होईल. नंतर सीमेन सॅम्पल कलेक्ट केलं जात. सॅम्पल घेतल्यानंतर एंड्रोलॉजिस्ट या सीमेन सॅम्पल मधून चांगले शुक्राणू वेगळे करून त्यांचं शुद्धीकरण केले जाते.

योग्य तपासणी आणि चाचणी केल्यानंतर, अंडी आणि शुक्राणू गर्भधारनेसाठी प्रयोगशाळेत ठेवले जातात, ३-४ दिवसांच्या चाचणीनंतर स्त्रीच्या गर्भाशयात अगदी स्वस्थ भ्रूण ट्रान्सफर केले जाते तसेच ज्या प्रकरणांमध्ये गर्भाला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे त्या केस मध्ये १४ दिवसांनी गर्भ हस्तांतरण केले जातात या प्रक्रियेला मेडिकल भाषेत एम्ब्र्यो ट्रान्स्फर म्हंटल जाते.

आयवीएफ प्रक्रियेतील शेवटचा टप्पा म्हणजे गर्भधारणेची चाचणी १४-१५ दिवसांनी, महिलेची गर्भधारणा चाचणी केली जाते त्यानंतर गर्भधारणा आणि बाळाचा जन्म अतिशय नैसर्गिक पद्धतीने होतो.

आयवीएफचं यश दर व फायदे :-

आयवीएफ उपचारांचा यशस्वी दर ७५-८०% आहे. यासोबतच अनुभवी डॉक्टरांची टीम उपचारानंतरही तुमच्या संपर्कात असते, तुमच्या प्रत्येक गरजेची आणि प्रश्नांची काळजी घेतली जाते. आणि जर तुम्हाला आयवीएफ प्रक्रिया करायची असेल तर तुम्हाला एक्सपर्ट फर्टिलिटी डॉक्टरचं सल्ला घेणे आवश्यक आहे.

आयवीएफचे फायदे:-

  1. स्वस्थ गर्भधारणा आणि स्वस्थ शिशुचा जन्म:- आयवीएफचं फायदा म्हणजे या प्रक्रियेत, स्वस्थ स्त्रीबीज आणि शुक्राणूंची निवड केली जाते, ज्यामुळे स्वस्थ गर्भधारणेची शक्यता वाढते. या मध्ये असणाऱ्या अनुवांशिक रोगांना टाळता येते ज्यामुळे स्वस्थ बाळ होण्याची शक्यता असते.
  1. शुक्राणू आणि अंडी दुसऱ्याकडून दत्तक घेऊ शकतो:- या प्रक्रियेत जर शुक्राणूंची गुणवत्ता खराब असल्यास किंवा अंड्यांची गुणवत्ता आणि संख्या कमी असल्यास तुम्ही डोनर कडून शुक्राणू आणि अंडी दत्तक घेऊन आयवीएफसाठी वापरू शकता.
  1. तुम्ही गर्भधारणेसाठीची वेळ ठरवू शकता:- या प्रक्रियचं एक मोठा फायदा म्हणजे तुम्हाला वेळेचं स्वतंत्र मिळते. तुम्ही तुमच्या वेळेनुसार गर्भधारण करू शकता.

तुम्ही जर ट्रीटमेंट सुरू केली तर डॉक्टर तुमच्यासोबत राहून तुम्हाला योग्य तो उपचार उपलब्ध करून देतात. तुम्हाला आयवीएफ प्रक्रिया करायची असेल तर तुम्हाला एक्सपर्ट फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Inamdar Multispeciality Hospital

पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispecialty Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते.पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may use these <abbr title="HyperText Markup Language">HTML</abbr> tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

*