Inamdar Hospital

या 4 कारणांमुळे कमी वयात वाढतोय कॅन्सरचा धोका

जगभरात कॅन्सर च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार भारतात गेल्या 10 वर्षांत कॅन्सर च्या रुग्णांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात कॅन्सर ने ग्रस्त 10 पैकी 6 लोकांचा मृत्यू होतो. या आजाराची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. ICMR ने आपल्या अहवालात असे म्हटले आहे की पुढील पाच वर्षांत देशातील कॅन्सर च्या रुग्णांची संख्या 12 टक्क्यांनी वाढू शकते. लहान वयातही या आजाराची प्रकरणे समोर येत आहेत ही फार चिंतेची बाब आहे. या प्राणघातक आजाराची प्रकरणे वाढण्याची मुख्य चार कारणे आहेत. ते आपण आजच्या या आर्टिकल च्या माध्यमातून पाहूया.

या 4 कारणांमुळे कमी वयात वाढतोय कॅन्सरचा धोका

द लॅन्सेट यांच्या अभ्यासात असे म्हटले आहे की लहान वयात कॅन्सर होण्याची चार मुख्य कारणे आहेत. 

वाईट जीवनशैली – Bad Lifestyle

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे प्रोस्टेट कॅन्सर, थायरॉईड कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणे झपाट्याने वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे. हल्लीची तरुण पिढी लवकर झोपत नाही ज्यामुळे त्यांची झोप बरोबर होत नाही आणि ते त्यांच्या जीवनशैलीत कसल्याही प्रकारच्या हालचाली करीत नाही ज्यामुळे कमी वयातच कॅन्सर सारखा आजार होण्याचा धोका वाढू शकतो. लोकांच्या जीवनात मानसिक तणावही खूप वाढला आहे. पूर्वी हा आजार फक्त वृद्धांमध्येच जास्त दिसून यायचा परंतु हल्ली तर 30 ते 40 वयोगटातील लोकांना सुद्धा हा आजार होण्याच्या घटना समोर येत आहेत.

चुकीच्या खाण्याच्या सवयी – Bad Eating Habits

लहान वयातच कॅन्सरची प्रकरणे वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी होय. फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ यांच्या वाढत्या ट्रेंडमुळे कॅन्सर होत आहे. जास्त प्रमाणात मांस खाणे आणि प्लास्टिकच्या वस्तूंमधील पाणी पिणे यामुळेही हा आजार वाढत आहे. कारण तुमच्या माहिती करिता आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, प्लास्टिकमध्ये असे कित्येक प्रकारचे घातक रसायने असतात जी आपल्या खाण्या पिण्यामध्यन शरीरात जातात आणि ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात.

वाढती लठ्ठपणाची समस्या – A Growing Obesity Problem

लहान वयात कॅन्सर होण्यामागचे तिसरे प्रमुख कारण म्हणजे वाढती लठ्ठपणाची समस्या. फक्त भारत या देशामध्येच नाही तर संपूर्ण जगातील अनेक वेग वेगळ्या देशांमध्ये देखील या लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. शरीराचा High BMI कॅन्सर ला निमंत्रण देत आहे. अशा स्थितीत शरीर तंदुरुस्त ठेवणे खूप गरजेचे आहे. BMI वाढत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दिवसातून किमान अर्धा तास व्यायाम करायला हवा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

धूम्रपान आणि मद्य सेवन – Smoking and Alcohol Consumption

सध्या तरुणांमध्ये धूम्रपान आणि दारूचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक तरुण हे फार व्यसनाधीनही झाले आहेत. सिगारेटचे जास्त सेवन केल्याने फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. दारूमुळे यकृत आणि पोटाच्या कॅन्सर ची प्रकरणे नोंदवली जात आहेत.