Laser Surgery for Piles in Pune

इंग्लिश मध्ये ‘Piles’ आणि संस्कृत मध्ये ‘अर्श ‘  आणि आपल्या बोलीभाषेत मूळव्याध नाव असणाऱ्या ह्या रोगाचे रक्तस्त्राव सहित व रक्तस्त्राव विरहित असे वर्गीकरण केलेले आहे.  हा आजार झाला असल्यास गुदद्वाराच्या आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांना सूज येऊन प्रचंड वेदना होतात. प्रसंगी रक्तस्त्राव देखील होतो. आणि तिथे सतत सुई टोचल्यासारखे  वाटत राहते. रक्तस्राव वारंवार होत राहिल्यास रुग्णाला अनिमिया  होऊ शकतो.

खूप दिवस हा आजार तसाच राहिला तर गुदद्द्वाराची आकुंचन क्षमता नष्ट होऊन गुदद्द्वाराजवळ  सुजलेल्या रक्तवाहिन्यांचा कोंब किंवा अंकुर तयार होतो आणि  अवघड जागेचे हे दुखणे खूपच त्रासदायक होऊन बसते.

पूर्वी चाळिशी नंतर होणारा हा आजार आता हमखास 18 ते 25 वयोगटातील तरुणांमध्ये हमखास दिसून येत आहे.

ह्याचे प्रमुख कारण म्हणजे बद्धकोष्ठता, आहारात  तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी , पाणी कमी पिणे, मसाल्यांचा अतिवापर, जंक फास्ट फूड चे अती सेवन हे आहे.

मूळव्याध टाळण्यासाठी आहारात पालेभाज्यांचे , कडधान्याचे प्रमाण वाढवणे अत्यावश्यक आहे.

लाजेपोटी रुग्ण ह्या आजाराची जास्त वाच्यता करत नाही आणि तसेच सहन करत राहतात.परंतु कधी कधी हा आजार इतका बळावतो की रुग्णाला  बसणे ही कठीण होऊन जाते. त्यासाठीच ह्या आजाराविषयी जागरूकता आणि त्यावरील वेगवेगळ्या उपचार पद्धती ह्यांची माहिती सर्वांना होणे खूप गरजेचे आहे.

हल्ली पारंपरिक शस्त्रक्रियेला पर्याय म्हणून लेझर उपचार पद्धतीस (Laser Surgery) रुग्ण अधिकाधिक पसंती देऊ लागले आहेत. लेझर पद्धती ही एक वरदानच ठरली आहे.

लेझर उपचार पद्धती व तिचे फायदे :

१. लेझर हेमोरायडोप्लास्टीमध्ये  (Laser Hemorrhoidoplasty (LHP)) रुग्णाला कुठेही जखम किंवा कट चिरा अशी इजा होत नाही. त्यामुळे रुग्णाला भुल द्यावी लागत नाही.

२. कट किंवा टाके नसल्यामुळे रुग्णाला शस्त्र क्रिया नंतर होणाऱ्या वेदना सहन कराव्या लागत नाहीत. शिवाय जखमेला होणाऱ्या इन्फेक्शन चा धोका ही रहात नाही.

३. पारंपरिक शस्त्रक्रियेप्रमाणे  रक्तस्त्राव होत नाही.

४. रुग्ण कमी वेळात लवकरात लवकर बरा होऊन त्याच्या दैनंदिन कामात व्यस्त होऊ शकतो ह्यामुळे रुग्णाचा एक प्रकारे आर्थिक फायदाच होतो.

५. सर्वात महत्वाचा फायदा एकदा शस्त्रक्रिया झाल्यावर हा आजार परत होण्याचे प्रमाण पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा खूपच कमी आहे.

लेझर (Laser) प्रक्रियेनंतर जळजळ होणे हा एकच तोटा आहे नाहीतर ह्या उपचार पद्धतीचे फायदे च जास्त आहेत. ह्या मुळेच दिवसेंदिवस लेझर उपचार पद्धती लोकप्रिय होत आहे. इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे लेझर पद्धतीने तज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जातात.

पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispeciality Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may use these <abbr title="HyperText Markup Language">HTML</abbr> tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

*