• Inamdar Multispeciality Hospital Pune Hospital Building, S. No. 15, Fatima Nagar, Wanowrie, Pune, Maharashtra 411040

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी(How to Take Care of Skin in Summer in Marathi)?

Skin care tips in summer

मित्रांनो, आता हिवाळ्यातील गुलाबी किंवा बोचरी थंडी कमी होऊन उन्हाळ्याचे वेध हळूहळू लागत आहेत. आपण जशी थंडीमध्ये आपल्या त्वचेची काळजी घेत असतो, तशीच उन्हाळ्यात सुद्धा त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. तसे न केल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चला तर बघू या, घरच्या घरी आपण त्वचेची काळजी(Skincare) कशी घेऊ शकतो व आपली त्वचा कशी टवटवीत व निरोगी ठेवू शकतो.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घावी यावर १५+ टिप्स

  1. उन्हाळ्यात त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्रमाणात पिणे आवश्यक आहे. तसेच आहारात पाणीदार फळांचा समावेश असावा.
  2. त्वचेची काळजी कशी घ्यावी यासाठी तुम्हाला तुमचा त्वचा प्रकार माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य उपाययोजना करून त्वचेची होणारी हानी टाळता येते.
  3. डोळ्यांखालची काळी वर्तुळे कमी करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करावा. उन्हात सतत काम पडत असेल, तर दर २ तासांनी सनस्क्रीनचा वापर करू शकतो.
  4. त्वचा प्रकारानुसार योग्य ते स्क्रब वापरून त्वचेवरील डेड स्कीन काढून टाकल्यास त्वचा जास्त टवटवीत दिसू लागते. १५ दिवसांतून एकदा त्वचा एक्सफोलिएट करून घ्यावी.
  5.  उन्हाळ्यात शक्यतो सुती, मुलायम व सैल कपड्यांचा वापर करावा.
  6. उन्हाळ्यात अनेकदा अंगाला घामाचा वास येत असतो. हे टाळण्यासाठी दररोज आंघोळीच्या पाण्यात २ थेंब इसेन्शिअल तेल टाकून आंघोळ करावी.
  7. व्हिटॅमिन सी युक्त क्रीम, पावडर यांचा वापर करावा.
  8. दररोज एक वेळा सी. टी. एम. करावे. सी. टी. एम. म्हणजे क्लिनसिंग, टोनिंग व मॉइश्चरायझिंग. क्लिनसिंग – चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवावा. टोनिंग – चेहरा गुलाबजलने स्वच्छ धुवावा. मॉइश्चरायझिंग – मॉइश्चरायझर लावावे.
  9.  नैसर्गिक उत्पादनांचा वापर करावा. फळांचा लेप चेहर्यावर २० मिनिटे लावून ठेवावा व नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. केमिकलयुक्त उत्पादनांमुळे इतर त्वचा विकारांचा धोका उद्भवू शकतो.
  10. कोमट पाण्याने आंघोळ करावी. खूप गरम पाणी वापरल्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते.
  11. डोळ्यांची होणारी जळजळ टाळण्यासाठी डोळ्यांवर थंड पाण्याची पट्टी किंवा काकडीचे तुकडे यांचा वापर करावा.
  12. बर्फाचे तुकडे एका कापडात ठेऊन त्वचेवर ठेवल्यास त्वचा शांत व थंड होण्यासाठी मदत होते.
  13. घामोळ्या व पुरळ यापासून बचाव करण्यासाठी आहारात दही, ताक अशा पदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा.
  14. चेहरा दिवसातून २ वेळा स्वच्छ पाण्याने किंवा फेसवॉशने धुऊन काढावा.
  15. शक्यतो वॉटर बेस्ड मेकअपचा वापर करावा किंवा कमीत कमी मेकअप असावा. उन्हाळ्यात मेकअप शक्यतो टाळावा.
  16. आहार व व्यायामासोबत पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आद्रता संतुलित राहते व चेहरा सतेज दिसतो.

तर मित्रांनो, वरील पद्धतीने आपण आपल्या त्वचेची योग्यरीत्या काळजी घेऊ या आणि येणार् उन्हाळ्याला सुसह्यपणे सामोरे जाऊ या.

Inamdar Multispeciality Hospital

पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल   (Inamdar Multispecialty Hospital, Pune) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते.पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may use these <abbr title="HyperText Markup Language">HTML</abbr> tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

*

X