Inamdar Hospital

020-66812333

9372619219

गर्भवती स्त्रीचा आहार(Pregnancy Diet in Marathi)

जर आपल्याला सुधृड अपत्य हवे असेल तर आपण गर्भातच त्याची काळजी घ्यायला हवी. गर्भधारणेनंतर बाळाच्या पोषणाची(Baby nutrition after pregnancy) जबाबदारी पूर्णपणे आईवर असते.बाळाचे योग्य पोषण होयासाठी मातेच्या शरीरामध्ये देखील पोषणमुल्ये अधिक हवीत.ती पोषणमुल्ये तिला आहारातूनच मिळतात, त्यामुळे तिने तिच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.गर्भवती स्त्रीचा आहार (Pregnancy Diet) गर्भवती स्त्रीला योग्य स्वरूपात आणि आवश्यक प्रमाणात आहार मिळाला नाही तर गर्भवती स्त्री बरोबर मुलाच्या आरोग्यावर व जीवनावर देखील परिणाम होऊ शकतो. 

बर्याचदा गर्भवतीने अधिक खावे, लोणी, तूप, गोडपदार्थ खावून वजन वाढवावे अशी धारणा असते. येता जाता तिला हे खावू नको, भरपूर खा असे सांगितले जाते.त्यामुळे ती  संभ्रमात पडते.तिने अधिक न खाता योग्य ते आणि योग्यप्रमाणात खाल्ले पाहिजे.तिने जेवणाच्यावेळी पोटभर न जेवता दोन घास कमी घ्यावे त्यामुळे पचन होण्यास मदत होईल.थोडे थोडे ३ ते ४ वेळा खावे.

गर्भवती स्त्रीने आहारात काय घ्यावे ?(Foods to Eat in Pregnancy in Marathi)

  1. सकाळी उठल्यावर दुध,दही,तूप,साखर व मध घालून तयार केलेले पंचामृत अवश्य घ्यावे.पंचामृत असिडीटी कमी करते,पचन सुधारेत, बाळाची कांती आणि स्वाथ्य चांगले राहते.
  2. रोज ५ ते १० भिजवलेले बदाम, काळ्या मनुका, खजूर, अंजीर लोहवाढीसाठी जरूर खावे.
  3. जीवनसत्वे मिळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, गाजर, कोबी, गहू, ज्वारी सारखी ध्यान्य, आंबट/गोड फळे टमाट, लिंबू आवर्जून खावे.
  4. प्रथिने मिळण्यासाठी डाळी, मोड आलेली कडधान्ये, वाटणा, ओल्या वाटण्याच्याशेंगा, भुईमुग, सोयाबीन यांचा आहारात समावेश करावा.
  5. कँल्शियम वाढीसाठी दुध, दुधापासून बनलेले पदार्थ, शेवग्याच्या शेंगा, बीट ,द्राक्ष, बाजरी, तीळ, उडीद आहारात असावे.
  6. अध्येमध्ये भूक लागल्यास, शेंगदाणा लाडू, राजगिरा लाडू,चिक्की असे पोषणमूल्य असलेले पदार्थ खावे.
  7. कोकम सरबत,लिंबू सरबत, मोरावळा, आमसूल घ्यावे त्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो.
  8. शतावरी, जेष्ठमध, अनंतमूळ, केशर घातलेले दुध नियमित घ्यावे, यामुळे उष्णतेचे विकार होत नाही आणि बाळ छान गुटगुटीत होते. बाळाचा रंग सुधारतो.
  9. ७ ते ८ ग्लास उकळलेले पाणी प्यावे.

गर्भवती स्त्रीचा आहारात काय व्यर्ज करावे (Foods to Avoid in Pregnancy in Marathi)

  1. मैद्याचे पदार्थ, बेकारी पदार्थ, जंक फूड कमी खावे हे पदार्थ फाक्त् मेद वाढवतात, त्याऐवजी ब्राऊन ब्रेड, गव्हाची किंवा नाचणीची बिस्किटे कधीतरी घ्यावी.
  2. साखरेचा वापर शक्यतो कमी करावा, आयुर्वेदिक गुळ वापरावा.
  3.  मिठाचा वापर कमी ठेवावा. जास्त मिठामुळे B.P वाढते. पापड, लोणची यामध्ये अधिक प्रमाणात मीठ असते म्हणून कमी खावे.थोडे काळेमीठ वापरले तर चालते.  
  4. चहा, कॉफी कमी करावी.

जर गर्भवती स्त्रीचा आहार(Pregnancy Diet) कमी दिला गेला तर बाळाचे वजन कमी होईल किंवा नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही परंतु बाळ कमजोर किंवा शक्तिहीन होऊ शकते त्यामुळे त्याला कोणत्याही रोग लवकर होण्याची संभावना असते म्हणून गर्भवती स्त्रीच्या आहाराला अनन्य साधारण महत्त्व आहे.

पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते.

पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.