पाइल्स ऑपरेशन | Piles Treatment in Pune | Inamdar Hospital

पाइल्स ऑपरेशन(Piles Operation) हे ऑपरेशन मुळव्याधीवर(hemorrhoids)उपचारासाठी करतात. गुदद्वाराच्या आतील/बाहेरील भागातील फुगलेल्या/सुजलेल्या दुखणाऱ्या रक्तवाहिन्यांना मुळव्याध(Arteriosclerosis)म्हणतात.

मुळव्याधीची लक्षणे(Symptoms of hemorrhoids in Marathi):

 1. शौच्याच्या वेळी दुखणे/रक्त पडणे.
 2. गुदभागी(Anus)खाज येणे/आव पडणे.
 3. गुदभागी कोंब/गाठ येणे.गुदभागी काहीतरी आहे असे सतत जाणवणे.
 4. भूक मंदावणे, पोट साफ न होणे.
 5. शौच्यामध्ये रक्तश्राव होणे(Bleeding in stool)व त्यामुळे वजन कमी होणे.

मुळव्याधीचा त्रास अधिक जाणवल्यास व औषध उपचाराने कमी न झाल्यास ऑपरेशनचा पर्याय निवडला जातो.

पाइल्स ऑपरेशनचे प्रकार(Types of piles operation in Marathi) :

 • रबर बॅन्ड लीगेशन(Rubber band ligation): या मध्ये मुळव्याधच्या कोम्बाभोवती एक इलास्टिक बँन्ड बांधतात, त्यामुळे कोम्बाला होणारा रक्त पुरवठा थाबल्यामुळे कोंब काही दिवसात गळून पडतात.हि पद्धत चवथ्या स्टेजला वापरता येत नाही.
 • स्केलोथेरपी इंजेक्शन(Sclerotherapy injection): या प्रकारामध्ये कोम्बाच्या मुळातील रक्तवाहिन्यामध्ये इंजक्शन द्वारे रसायन सोडतात, त्यामुळे कोम्बाचा आकार कमी होतो. यामध्ये ती जागा बधीर होवून वेदना कमी होतात. दुसऱ्या व तिसऱ्या स्टेजमध्ये हि प्रणाली बँन्डिगला पर्याय म्हणून वापरतात.
 • इन्फ्रारेड कोयाग्युलेशन(Infrared coagulation): या उपचार पद्धतीत इन्फ्रारेड किरणांचा वापर कोम्बावर करतात.यामध्ये उष्णता निर्माण होवून कोंब जळतात. पाहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये हि पद्धत वापरतात
 • हिमोर्ह्यायडेक्टोमी ( मुळव्याधचे ऑपरेशन): वरीलपैकि कुठल्याही पद्धतीने अथवा औषधोपचाराने फरक पडत नसल्यास, रुग्ण चवथ्या स्टेजमध्ये असल्यास हे ऑपरेशन करातात. या ऑपरेशनमध्ये भूल देवून कोंब काढून टाकतात.या ऑपरेशनसाठी रुग्णाला ३ ते ४ दिवस रुग्णालयात राहावे लागते व त्यानंतर १ ते २ आठवडे ड्रेसिंग केली जाते. १ ते २ आठवड्याने रुग्ण आपली कामे पूर्वीप्रमाणे करू शकतो.रुग्णाला गरम पाण्याचा शेक घेणे, वेदनाशामक औषधे, पोटसाफ होण्याची औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते.या ऑपरेशन नंतर फायबरयुक्त आहार घ्यावा.
 • हिमोर्ह्यायडस्टेपलिंग(Hemorrhoid stapling): यामध्ये भूल देऊन आतील कोंब स्टेपल करून नॉरमल पोझिशनला आणतात, त्यामुळे रक्तप्रवाह थांबून कोंब गळून जातात. हि पद्धती बाहेरील कोंबासाठी उपयुक्त नाही.मात्र यामध्ये पुन्हा त्रास होऊ शकतो व गुंतागुंत निर्माण होवू शकते. जरी हि पद्धत वेदनादायक नसली तरी नं ४ ची उपचारपद्धत अधिक उपयुक्त आहे.
 • नवीन आलेली : यामध्ये लेझर किरणांचा मारा केल्यामुळे मुळव्याध जाळून नष्ट होते. सध्या हीच उपचारपद्धती जास्त प्रभावी ठरत आहे . यामध्ये कुठलीही चिरफाड केली जात नाही आणि टाकाहि घातला जात नाही. यामध्ये कुठलाही त्रास न होता त्याजागी परत मुळव्याध होत नाही. हि प्रक्रिया रुग्णासाठी वरदान ठरत आहे.

पाइल्समधील आहार(Foods to eat during piles in Marathi):

 1. फायबरयुक्त आहार(Fiber rich diet) घ्यावा, हिरव्या पालेभाज्या, फळे इ.
 2. दिवसभरात ७ ते ८ ग्लास पाणी, जिरे घालून ताक प्यावे.
 3. तिखट/मसालेदार पदार्थ, फास्टफूड/जंकफूड टाळावे.
 4. नियमित व्यायाम करावा, अधिक वेळ बसू नये.

पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल(INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL)  हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते.

पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may use these <abbr title="HyperText Markup Language">HTML</abbr> tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

*