जॉइंट रिप्लेसमेंट (Joint Replacement) ,ज्याला आर्थ्रोप्लास्टी (Orthoplasty) देखील म्हणतात. जेव्हा उपचारांनी तीव्र सांधेदुखी कमी होत नाही तेव्हा सांधे बदलणे हाच एक उपाय केला जातो.
या शस्त्रक्रियेमध्ये खराब झालेले सांधे बदलून कृत्रिम सांधे बसवले जातात. हे सांधे धातू, सिरॅमिक किंवा प्लास्टिकचे बनलेले असतात. शल्यविशारद (Surgeons) आपल्या शरीरातील कोणत्याही भागाचा सांधा बदलु शकतात. पण सर्वात जास्त हिप, गुडघा आणि खांदा रिप्लेसमेंटच्या केसेस मोठ्या प्रमाणात आढळून येतात. सांधे (Joint replacement ) नंतर रुग्णाला बरे होण्यासाठी 6 ते 8 आठवडे लागतात. यादरम्यान खूप काळजी घ्यावी लागते. जास्त हालचाल किंवा कोणत्याही प्रकारचे काम करण्याचा प्रयत्न करू नये, कारण यामुळे इतर समस्या उद्भवू शकतात.
सांधे प्रत्यारोपणा (Joint Replacement) नंतर आपली काळजी कशी घ्यावी ते आपण जाणून घेऊया –
१. वेळेवर डॉक्टरांना भेटणे आणि औषधे घेणे.
२. जर शस्त्रक्रियेनंतर औषधे बदलली असतील तर औषधांच्या प्रिस्क्रिप्शनची (Prescription) नोंद ठेवणे.
३.आधारा शिवाय चालण्याचा प्रयत्न करू नये. चालण्यासाठी काठी किंवा वॉकर वापरणं आवश्यक आहे.
४. शस्त्रक्रिया झाली त्याठिकाणी जर सूज किंवा रक्तस्त्राव होत असेल किंवा पाय पिवळे-निळे दिसत असतील तसेच ताप, वेदना, जळजळ असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधणे.
५. शस्त्रक्रिया केली गेली आहे, त्या ठिकाणी साबण आणि पाण्याने हळुवारपणे धुवावे आणि स्वच्छ कापडाने हलक्या हाताने कोरडे करावे. शस्त्रक्रिया केलेल्या भागाभोवती लोशन किंवा पावडर लावू शकतो जेणेकरून टाक्यांवर जखम होणार नाही.
६. टाके असलेल्या भागात दोन आठवडे पाणी लागू देऊ नये.
७. टाके बरे होण्यासाठी 7 ते 10 दिवस लागू शकतात आणि जर 2 आठवड्यांनंतर टाके निघाले नाहीत, तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हळुवारपणे काढतात.
८. शस्त्रक्रियेनंतर स्नायु बळकट व्हावे यासाठी लोहयुक्त आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. द्रवपदार्थ भरपुर प्रमाणात घ्यावे.
९. एकाच जागी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ बसू नका. थोडा वेळ चाला.
१०. Joint replacement नंतर स्नायू पूर्ववत बरे झाल्यानंतरही काही महिन्यांपर्यंत खेळणे देखील टाळले पाहिजे तसेच सायकल चालवणे, पोहणे, इतर व्यायाम देखील टाळावे.
११. डॉक्टरांनी दिलेले व्यायाम नियमित करावे. जर हे व्यायाम नियमितपणे केले नाहीत तर सांध्यांच्या हालचालीत अडचण येऊ शकते.
Joint Replacement नंतर कोणत्याही प्रकारची अडचण आली तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उगाचच घरगुती उपाय करून वेळ वाया घालवू नये. नाहीतर खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल आणि रिप्लेसमेंट केलेला भागही निकामी होऊ शकतो.
पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispeciality Hospital) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Inamdar Multispeciality Hospital) सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते