चेहऱ्यावर मुरूम का येतात? | Inamdar Hospital

चेहऱ्यावर मुरूम (Acne on the face) येण्याची अनेक कारणे आहेत, सतेज कांती असलेला तुकतुकीत चेहेरा हा सर्वांनाच हवाहवासा वाटतो. आजच्या काळात स्वतःला सिद्ध करण्यासाठी, छाप पाडण्यासाठी बाह्य सौंदर्याला पण तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे. असं म्हणतात की First Impression is last Impression. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो.

सर्वप्रथम आपले लक्ष वेधून घेतो तो म्हणजे आपला चेहेरा. चेहेऱ्याची त्वचा खूप संवेदनशील असते. चेहेर्याच्या सौंदर्याला ग्रहण लागते ते डाग, वांग, डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि साजेहेऱ्यावर येणारे मुरूम यामुळे. त्यातही वयाच्या विविध टप्प्यावर जास्त त्रास  होतो तो म्हणजे मुरूमांचा. कशामुळे येत असतील मुरूम आपल्या चेहेऱ्यावर?

प्रत्येकाची प्रकृती व त्वचेचा प्रकार वेगळा असतो. पण सगळ्यांनाच मुरूम येण्याची समस्या कधीतरी येतच असते. त्याला बरीच कारणे आहेत ती पुढीलप्रमाणे:-

  1. आपल्याच शरीरात असणारी हार्मोन्स काही प्रमाणात मुरुमाना कारणीभूत असतात. वाढीच्या वयात हार्मोन्स कमीजास्त होतात. त्याचा परिणाम त्वचेवर होतो व मुरूमे यायला सुरुवात होते.
  2. शरीरातील कफ, पित्त दोषांमुळे व आहारविहारातील बदलांमुळे त्वचेतील तैलग्रंथी व स्वेदग्रंथींमध्ये तैलयुक्त स्त्राव जास्त प्रमाणात तयार होतो. त्वचा अधिक तेलकट होते. जिवाणूंच्या वाढीसाठी पोषक वायावरण तयार होते. संसर्गामुळे तेथील ग्रंथींमध्ये वाढ होते. त्याचे रूपांतर मुरूम किंवा पुटकुळी मध्ये होते.
  3. अयोग्य आहारविहारामुळे मुरूम कमी होण्याऐवजी वाढत राहतात. मुरूमांना पोषक वातावरण तयार होते.
  4. प्रदूषण, धूळ, अति ऊन यामूळेही मुरूम वाढण्यास मदत होते. बदलत्या ऋतूचाही त्यावर परिणाम होतो.
  5. आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे पोटाचे किंवा पचनसंस्थेचे अनारोग्य. जर पचनसंस्था नीट कार्य करत नसेल तर इतर अनेक परिणामांबरोबर त्वचेवरही त्याचा दुष्परिणाम होतो. मालवरोध सारखे विकार असतील तर चेहेर्यावर हमखास मुरूम येतात.
  6. शरीरिक आरोग्याबरोबर मानसिक स्वास्थ्य देखील महत्वाचे असते. ताणतणाव, अतिविचार करणे, काळजी करणे याचा त्वचेवर परिणाम होतो व त्वचा ते मुरुमांच्या स्वरूपात दाखवते. स्ट्रेस हा त्वचा विकारांना नक्कीच कारणीभूत ठरतो.
  7. शेवटचे पण महत्वाचे कारण म्हणजे सौंदर्य प्रसाधने. त्वचेवर आपण अनेक प्रयोग करत असतो. वेगवेगळ्या रसायनांचा भडीमार करत असतो. एकामागून एक असे प्रसाधने वापरत असतो. त्यापैकी काहींची allergy येते व चेहेरा मुरुमानी भरून जातो. त्यावर उपाय म्हणून परत chemical युक्त औषधे लावतो व या चक्रात आपण अडकतो.

उमलत्या वयात चेहेरा निरोगी ठेवण्यासाठी तो दिवसातून 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवावा. चेहऱ्यावर मुरूमवर उपचार(Face Acne treatment) डॉक्टर सांगतील तेच उपचार करावे. नाहीतर कोवळ्या वयातील समस्या चेहेर्यावरील डागांच्या रुपात आयुष्यभर आपल्या आठवणीत राहते.

पुण्यात इनामदार हॉस्पिटल मध्ये चेहऱ्यावर मुरूम (Acne on the face) वर योग्य पद्धतीने उपचार केले जातात. एकदा अवश्य भेट द्या आणि चिंतामुक्त व्हा.

पुण्यातले इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल(INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे  हॉस्पिटल आहे. येथे असणारी डॉक्टरांची टीम ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारी म्हणून ओळखली जाते. रुग्णाची काळजी घेणे व त्यांच्या कुटुंबाला आधार देणे यासाठी हॉस्पिटलची सर्व टीम वचनबध्द आहे. वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते.

पुण्याच्या केंद्रस्थानी असलेले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले  इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL) सर्व आजारांवर उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करते.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may use these <abbr title="HyperText Markup Language">HTML</abbr> tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

*